१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर होणार

सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १ फेब्रुवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहात सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यापूर्वी ३१ जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री यंदाचे बजेट सादर करणार आहेत.