मलकापूर : नूतन विद्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मलकापूर- उमेश इटणारे

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नूतन विद्यालय मध्ये ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला एस.एन.फिरके सिड्स चे संचालक सुरेश फिरके याच्या प्रमुख उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण प्राचार्य ए.डी. बोरले सर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सुरेश फिरके यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय गणतंत्र दिवस हा त्याग तपश्चर्या आणि देशभक्तांच्या बलिदानाची अमर कहाणीचा सण आहे. आज देश पातळीवर युवा वर्गाला प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता कि प्रजेवर सत्ता धर्मनिरपेक्ष जागतिक स्तरावर भारत महासत्ता कसा होईल याचे चिंतन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सुरेश सीताराम फिरके यांनी केले यावेळी एन. सी. सी. अधिकारी संजय कुंभरे सर, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आत्माराम बळी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थिती होत्या.