मलकापूर प्रतिनिधी/ उमेश इटणारे
मलकापूर तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम संसद शेलगांव बाजार येथील सरपंच पदाचे सुरु असलेल्या कारकिर्दींमध्ये व लोकनियुक्त सरपंच साै.सरलाताई अमित खर्चे यांनी सर्व बाबी शांत व संयमी पणे सांभाळत केवळ आणी केवळ गाव विकासच साधला आहे. यात त्यांनी आतापर्यंत गावाला एक विकासाची आगळी – वेगळी दिशा देत यशाचे ऊंच असे शिखरांपर्यंत पोहचविले व हे आपण सर्व बघतोच आहोत. गावात सदैव नवनविन ऊपक्रम राबवित सदैव सर्वांचे लक्ष वेधित वा गावाचे नाव उज्वल करणे हे जणु त्यांना व्यसनच जडले आहे. असल्याचे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले. सरपंच पदाचा भार स्विकारल्यानंतर लगेच आपले कर्तृत्त्वाचा व हुशार,चाणाक्ष व गावविकासाची भुक या वृत्तीचा परिचय देत सरपंच साै.सरलाताई खर्चे यांनी आपले सहकाऱ्यां समवेत गावांत अनेक विकासकामे, स्वच्छता आदी बाबींवर काम करित स्वत:ला गावविकासात झोकुन देत सन २०१७/१८ या वर्षी गावाला एक अतिशय अविस्मरणीय असे जिल्ह्यातुन प्रथम क्रमांकाचे स्मार्ट ग्राम पारितोषिक मिळवुन देत गावाचे शिरपेचात एक मानाचा तुरा रोविला. त्यातुन मिळालेल्या बक्षिसांचे रक्कम रु.५० लक्ष यातून गावांत रोजचे दैनंदिन जिवनात रस्ते अतिशय महत्त्वाचे असल्याने त्या रकमेतुन रु.३० लक्ष रकमेचे सिमेंट काँक्रिट रस्ता करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सदर कामाची प्रशासना तर्फे मान्यता मिळवित सदर कामाचा भुमिपुजन सोहळा आज दि.२४ जानेवारी रोजी माजी महसुल मंत्री महामेरु ,ऊत्तुंग व्यक्तिमत्त्व, लोकनेते मा. एकनाथराव खडसे साहेब यांचे हस्ते फित कापुन छोटेखानी सत्कार सोहळा कोरोनाचे नियम पाडून पार पडला. यावेळी जि.प सदस्य महेंद्र गवई, पं.स साै.उज्वलाताई पाटील, रॉका नेते, संतोषभाऊ रायपुरे, अरुणभाऊ अग्रवाल, कॉग्रेस नेते, गणेशसिंग राजपूत, स्विह सहाय्यक योगेश कोलते सर, सामाजिक कार्यकर्ते प्रविण खर्चे, उदय भोळे, डॉ.अमित खर्चे पत्रकार गणेश वाघ सह सरपंच सरलाताई खर्चे, उपसरपंच योगेश खंडारे, सचिव आर.एस.सुरळकर, सर्वश्री ग्रा.प सदस्य नितिन खर्चे, वैभव खर्चे साै.रिता खर्चे, छाया खर्चे यांच्यासह ग्रा.पं कर्मचारी गावकरी मंडळी उपस्थित होते.