मलकापूर: पद्मश्री डॉ वि भि कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर नगर परिषदचे मा. नगरसेवक व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते तसेच जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य श्री. राजूभाऊ वाडेकर यांची उपस्थिती लाभली. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक हा असा देश आहे, जेथे तत्त्वाच्या शासनामध्ये, सामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते. अशा राजवटीला प्रजासत्ताक म्हणतात. ‘लोकशाही’ यापेक्षा वेगळी आहे. लोकशाही जिथे शासन सामान्य जनतेच्या किंवा त्यांच्या बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालवले जाते. आज जगातील बहुतेक देश प्रजासत्ताक आहेत आणि त्याबरोबरच लोकशाहीही आहे. भारत स्वतः एक लोकशाही प्रजासत्ताक आहे. असे प्रतिपादन मा. नगरसेवक राजूभाऊ वाडेकर यांनी केले.
२६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. याची माहिती पुढच्या पिढीला मिळावी म्हणून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञां केलीच पाहिजे, आणि त्यानुसार कोलते महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. सोबतच महाविद्यालयातिल एन. सी. सी. व एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मो. जावेद व किशोर भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी प्रा. नितीन खर्चे, रमाकांत चौधरी, संतोष शेकोकर, संदीप खाचणे सह सर्व प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग कोरोना नियमांचे पालन करीत महाविद्यालयात उपस्थित होता.