खेड : तालुक्यातील धामणी कदम वाडी येथे शिवीगाळ का करतोस त्याचा जाब विचारल्याने 4 जणांनी मिळून घरात घुसून मारहाण केल्याची घटना 25 जानेवारी रोजी घडली आहे. जिगर गोपाळ नाडार (29, धामणी, दमवाडी, खेड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज बळीराम कदम (32), मयुर तानाजी कदम (30), अतुल बळीराम कदम (29), मनोज तानाजी कदम (33, सर्व रा. धामणी कदम वाडी, खेड) यांनी नाडार याला शिवीगाळ केली. यावेळी नाडार याने शिवीगाळ का करता याचा जाब विचारला. याचा राग संशयित 4 जणांनी मनात ठेवून दिला होता.
दरम्यान दुसऱ्या दिवशी 25 जानेवारी रोजी नाडार हा घरामध्ये झोपलेला असताना पंकज, मयूर, अतुल, मनोज यांनी घरात घुसून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यातील मनोज याने हातातील लोखंडी सळीने नाडार याच्या डाव्या डोळ्यावर जोरदार प्रहार केला. यावेळी नाडार याची आई सोडवण्यासाठी गेली असता तिलाही धकला बुकल केली.
याबाबतची फिर्याद जिगर नाडार याने खेड पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार संशयित चौघांवर भादवी कलम 452, 323, 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.