कबनुर प्रतिनिधी / चंदुलाल फकीर
ग्रामपंचायत कबनूर झेंडा चौक येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीस जिल्हा परिषद सदस्य सौ विजयाताई पाटील व सरपंच सौ शोभा पोवार यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून फोटो पूजन करण्यात आले त्यानंतर ध्वज स्तंभाचे पूजन सरपंच सौ शोभा पोवार यानी केले कबनूर गावचे तलाठी पाटील साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवले नंतर भारत देशाची शान तिरंगा ध्वजास वंदन करून सलामी देण्यात आली झेंडावंदन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ विजयाताई पाटील, तालुका पंचायत सदस्य सौ रेशमा सनदी,सौ सुलोचना कट्टी, सरपंच सौ शोभा पवार, उपसरपंच सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य व सदस्या ,ग्रामसेवक आदलिंग साहेब कबनूर गावातील नागरिक उपस्थित होते.