डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता

मुंबई : अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला एम.डी. (Radio- diagnosis) हा नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 3 विद्यार्थी प्रवेशक्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या महाविद्यालयातील नमूद वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार दोन इतकीच राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील.

अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 150 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.