इचलकरंजी– लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने दरवर्षी देणेत येणाऱ्या लायन्स गौरव पुरस्कारासाठी निवडणेत आलेल्या कर्तृत्वशाली व्यक्तींची व संस्थेची नावे कमिटी चेअरमन ला.विनय महाजन व क्लबचे अध्यक्ष ला. लक्ष्मीकांत भट्टड यांनी जाहीर केली.
प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा व संस्थांचा लायन्स गौरव पुरस्कार देवून सन्मान केला जातो. यावर्षी निवड कमिटी चेअरमन लायन विनय महाजन यांनी श्री निकुंज हरिप्रसाद बगडिया (उद्योग व व्यापार क्षेत्र), श्री सुनील सीताराम महाजन (सामाजिक क्षेत्र), श्री संजय महादेव कांबळे ( उत्कृष्ट नगरसेवक), श्री. गुंडाप्पा जिन्नाप्पा रोजे (चौगुले) (दुध आणि दुग्ध व्यवसाय), सौ. वैभवी दीपक निंगुडगेकर (हॉटेल व्यवसाय ) श्री. दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अॅड रिसर्च फौंडेशन (सामाजिक संस्था) यांची नावे जाहीर केली.
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी ही सेवाभावी संस्था विविध सेवाकार्यांच्या माध्यमातून लोकाभिमुख सेवासंस्था म्हणून गेल्या ६२ वर्षापासून परिचित आहे. अनेक प्रकारच्या सेवांबरोबरच गत ३२ वर्षापासून क्लबच्यावतीने लायन्स गौरव पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी योग्य मान्यवरांची निवड क्लबने नियुक्त केलेल्या कमिटी मार्फत केली जाते. याकमिटीचे अध्यक्ष ला. विनय महाजन, कमिटीच सदस्य ला. विजयकुमार राठी, ला. सुरज दुबे यांनी ही नावे जाहीर केली यासाठी ला. विजयराज जाजू, ला. श्रीकांत सारडा व ला. लक्ष्मीकांत बांगड यांचे सहकार्य लाभले. या पुरस्कारासाठी कोणाची मागणी अथवा अर्ज विचारात न घेता प्रत्यक्ष निरीक्षणातूनच योग्य व्यक्ती व संस्थेची निवड केली जाते. त्यामुळे या पुरस्काराला समाजात मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखले जाते.