कबनूर -(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) येथील वीरभद्र पांचाळ समाज संघटनेतर्फे आयोजित विश्वकर्मा जयंती कार्यक्रमात सुरुवातीस विलास सुतार यांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कबनूर गावचे माजी सरपंच गोपीनाथ सुतार यांनी महामानवाच्या कार्याची व विचारांची जोपासना करण्यासाठी जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन याप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सचिन सुतार होते उपाध्यक्ष अंकुश सुतार यांनी स्वागत केले सचिन सुतार यांनी प्रास्ताविक केले सदर कार्यक्रमांमध्ये समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्जुन सुतार तसेच कौस्तुभ सुतार व मारुती बोडके यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास अनिल सुतार, सुनील सुतार, महादेव बडीगेर, रतन सुतार आदी समाज बांधव उपस्थित होते खजिनदार दीपक सुतार यांनी आभार मानले.
Posted inकोल्हापूर
कबनूर मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Last updated on February 15, 2022