गोंडवाकडी येथे गरजूंना राशन किट्स वाटप
सुनील शिरपुरे/झरीजामणी
केळापूर तालुक्यातील गोंडवाकडी येथे इंडिया फुड बँकिंग नेटवर्क व अन्नक्षेत्र फ़ाउंडेशन तर्फे 82 गरजू परिवाराला राशन किट्स वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवार रोजी पार पडला. या कार्यक्रमाला आमचे आदर्श गुरू व ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ जिल्हा सचिव प्रसादजी नावलेकर व गट ग्रामपंचायत गोंडवाकडीचे ग्रामसेवक सुनीलजी चिंतावार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना गोंडवाकडी येथे पांढरकवडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार साहेब, केळापूर तहसीलचे तहसीलदार सुरेश कव्हाळे साहेब, नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. अरुणाताई पुरोहित, गट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दयानंद सोयाम, पंचायत समितीचे बी.डी.ओ.रिजेवाड सर, भाजपा मच्छीमार सेल जिल्हा महामंत्री व भोई समाज युवा मंच जिल्हा अध्यक्ष प्रदिप ना.भनारकर, ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दामोधर बाजोरिया, ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष यशवंत काळे, ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ जिल्हा सचिव अभय निकोडे, विदर्भ भाग प्राथमिक शिक्षा प्रमुख विकास राठोड, अंचल ग्राम स्वराजमंच प्रमुख रमेश पालेपवार, अंचल कार्यालय प्रमुख शुभम मेश्राम, पाटणबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते गणेश मडावी व गोंड वाकडी येथील समस्त गावकरी बांधव व भगिनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.