पुणे : राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ईडी सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ईडीसमोर आंदोलन केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,
ईडी सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. या केसमध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, काँग्रेसकडे टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करत असतात. आमचा येणाऱ्या महापालिकेत मुद्दा हाच आहे. ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष असा फॉर्म्युला आहे. आम्ही काय केलं हे सांगू, तुम्ही काय केलं ते सांगा, असेही ते म्हणाले आहेत. जे गलिच्छ बोलतात त्यांना परवानगी आणि मी तर सुसंस्कृत बोलतो, नाव न घेता असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. भुजबळांना दोन वर्षे जेलमध्ये कोणी भेटायला पण जात नव्हते. शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात. त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोपही त्यांनी केला आहे.