माणुसकी फौंडेशनचे वतीने अकिवाट येथे वहान परवाना शिबिर संपन्न..
अकिवाट
माणुसकी फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त अकिवाट शाखा वतीने वहान परवाना शिबिर आयोजित केला होता.परवाना काढण्याचे ऑनलाईन कामकाज चंद्रकांत नाईक,अनिल कोळी व रोहन मगदुम यांनी केले.
माणुसकी फौंडेशनचे वतीने यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार व यशवंत सरपंच पुरस्कार मिळाले बद्दल गावचे सरपंच विशाल चौगुले व ग्रामसेवक नंदकुमार निर्मळे यांचा सत्कार करण्यात आला.आदेश संजयकुमार गायकवाड याने एम.बी.बी.एस परिक्षा उत्तीर्ण झाले बद्दल, राहूल राजेंद्र सनदी यांची तलाठी पदी निवड झाले बद्दल,सुरज रायनाडे व मित्रांनी वृक्षारोपण करून त्याची जतन केले बद्दल, सुरेश छत्रे यांनी सांगली जिल्हा रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले बद्दल व रमेशकुमार मिठारे यांना उत्कृष्ट पत्रकार व बसव पुरस्कार मिळाले बद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरगदार व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माणुसकी फौंडेशनचे शाखा अध्यक्ष-रमेश कांबळे, जेष्ठ पत्रकार – गणपती कागे, हेमंत कांबळे,महेश कांबळे,विजय माने, सोमनाथ कांबळे, विकास कांबळे, सौरभ कांबळे,रोमीत कांबळे, योगेश कांबळे,शशी कांबळे, संतोष कांबळे, श्रीराम हुजरे व माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते
Posted inकोल्हापूर
माणुसकी फौंडेशनचे वतीने अकिवाट येथे वहान परवाना शिबिर संपन्न..
