सैनिक टाकळी येथील रोटरी क्लबच्या सहकार्याने झालेल्या बलदवा व्यायामशाळा चे लोकार्पण सोहळा

सैनिक टाकळी येथील रोटरी क्लबच्या सहकार्याने झालेल्या बलदवा व्यायामशाळा चे लोकार्पण सोहळा

सैनिक टाकळी येथील रोटरी क्लबच्या सहकार्याने झालेल्या बलदवा व्यायामशाळा चे लोकार्पण सोहळा

सैनिक टाकळी/ रमेशकुमार मिठारे
रोटरी क्लब जयसिंगपूर यांच्या सहकार्याने सैनिक समाज कल्याण मंडळ सैनिक टाकळी येथील बलदवा व्यायामशाळा चे तीन राज्याचे रोटरीचे गवर्नर मा.रोटे. गौरिष धोंड यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आला.रोटरी क्लब नेहमी सामाजिक उन्नतीसाठी कार्य करत आहे.व सैनिक टाकळी येथील युवक सैन्यात सामील होऊन देशसेवा करतात हे मला अभिमान आहे.समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. आपण विश्वस्त म्हणून कार्यरत पाहिजे.सैनिक समाज कल्याण मंडळाने ते जपलं आहे.म्हणुन आज रोटरी क्लबच्या सहकार्याने जयसिंगपूर येथील बलदवा कुटुंबियांनी व्यायाम शाळा बांधकाम करुन दिली ही पोहच पावती आहे.असे मत प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे गव्हर्नर धोंड यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वागत करताना सैनिक समाज कल्याण मंडळ चे अध्यक्ष बी.एस.पाटील म्हणाले की सैनिक टाकळी गावच्या नागरिकांचं DNA तपासणी केली तर ते सैनिकांच रक्त असेल , येथील प्रत्येक युवक सैन्य भरतीसाठी उत्सुक असुन भारतमातेच्या सेवेसाठी आपलं तारूण्यपण त्याग करतो.या सैनिकांना विसावा मिळावा यासाठी आमचं सैनिक समाज कल्याण मंडळ कार्यरत असलेच सांगितले.
यावेळी गावचे सरपंच सौ हर्षदा पाटील, उपसरपंच- संतोष गायकवाड, पोलिस पाटील- सौ.सुनिता पाटील, शिवसेनेचे नेते- मधुकर पाटील,माजी उपसभापती पं.स.शिरोळ- हरीशचंद्र पाटील,माजी सरपंच- उमेश पाटील,सैनिक समाज कल्याण मंडळ टाकळी चे सचिव -अर्जुन सावंत,ऑन.लेफ्टनंट- शामराव पाटील,ऑन.कॅप्टन- प्रकाश खोत सर्व पदाधिकारी, रोटरी क्लबचे राजकुमार बलदवा, अभय बनजवाडे,शिवराज पाटील,बि.टी.नाईक(C.A), अविनाश मगदुम, डॉ.संजय पाटील, शिवाजी बाबर,अजित पाटील आजी माजी सैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोटरी क्लबचे सुरेश पाटील यांनी केले तर आभार शिवाजी हायस्कूल टाकळीचे एन.सी.सी चे अध्यापक उदय पाटील यांनी मानले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *