⭕️ नव्या तालुका कार्यकारिणीत प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांना संधी
रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील यापूर्वीच्या तालुका कार्यकारण्या बरखास्त करून पक्षाला पुन्हा बळ देण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय नव्या कार्यकारण्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नूतन कार्यकारिणी मध्ये रत्नागिरी तालुक्यातून प्रत्येक विभागामधील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी मधून एक लहान ओबीसी नावाचा घटक राजसत्तेपासून वंचित राहू नये या सूत्रावर ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या राजकारणात केंद्रबिंदू मानले आहे. प्रस्थापित पक्षांनी रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यात धनगर समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी धनगर समाजाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. रत्नागिरी तालुक्याची जबादारी धनगर समाजाचे कर्तव्यदक्ष नेतृत्व मा. रवींद्र कोकरे यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महासचिव पदी मुकुंद सावंत यांच्या बरोबरच ७ उपाध्यक्ष, ५ सचिव, २ संघटक, ३ कोषाध्यक्ष व ३ संपर्क प्रमुख , २ प्रसिद्धी प्रमुख अशी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
◾नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
रवींद्र कोकरे (तालुकाध्यक्ष), शब्बीर खान (उपाध्यक्ष), भीमेश जाधव (उपाध्यक्ष), प्रवीण कांबळे (उपाध्यक्ष), राजेंद्र कांबळे (उपाध्यक्ष), किरण पवार (उपाध्यक्ष) दर्शक मोहिते (उपाध्यक्ष) अशा 7 उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच मुकुंद सावंत (महासचिव), विजय जाधव (सचिव), सिद्धार्थ जाधव ( सचिव), पंकज पवार (सचिव ), समीर कांबळे (सचिव), रवींद्र कांबळे ( सचिव), असे 6 सचिव व दीपराज कांबळे (कोषाध्यक्ष), सुशांत जाधव (उपकोषाध्यक्ष), संतोष सावंत (उपकोषाध्यक्ष), सुधीर कदम (संपर्क प्रमुख), राकेश कांबळे (उप संपर्कप्रमुख), सर्वेश डोर्लेकर (उप संपर्कप्रमुख), निखिल तांबे ( प्रसिद्धी प्रमुख), प्रवीण नथुराम जाधव (उप प्रसिद्धी प्रमुख), जयवंत जाधव (संघटक), प्रतीक कदम (संघटक) असे 3 कोषाध्यक्ष, 3 संपर्क प्रमुख, 2 प्रसिद्धीप्रमुख, आणि 2 संघटकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तालुका कार्यकरिणीमध्ये प्रत्येक गावातील किमान ५ कार्यकर्त्यांचा समावेश करून तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. असे पक्षाच्या प्रसिद्धपत्रकातून कळवण्यात आले आहे.