माय मराठी पुरस्काराने जि. प. शिक्षिका डाॅ. यमुना नाखाळे सन्मानित
✍ नंददत डेकाटे // नागपूर जिल्हा प्रतिनिधी
माय मराठी पुरस्काराने डॉ.यमुना नाखाळे सन्मानित नागपूर येथील डॉ. यमुना नाखाळे यांना जागतिक मराठी भाषा दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात माय मराठी 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वि वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी सौंदड येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा नागपूरच्या मराठी शिलेदार बहुद्देशीय संस्थेने आयोजित केला होता संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील व सविता पाटील यांनी संपादित केलेल्या माय मराठी प्रातिनिधिक प्रकाशनानंतर कवी कवयित्रींच्या संमेलनात नागपूर येथील डॉक्टर यमुना नाखाळे यांना सुधा मेश्राम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा. वैशाली अंड्रस्कर, तारका रुखमोडे, सतीश भालेराव, सुरज भिलकर, रजत डेकाटे,किशोर बन्सोड उपस्थित होते.