बेळगांव/कक्केरी दि. १ मार्च २०२२रोजी
भारताचे माजी गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या पत्नी सौ उज्ज्वलाताई शिंदे यानी दि. १ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र कक्केरी ता. खानापूर जि. बेळगांव येथील महाप्रसादी शरण कक्कय्या यांच्या समाधी मंदीराचे दर्शन घेऊन महाअभिषेक व पुजा केली . यावेळी माजी कस्टम आयुक्त व साहित्यिक ना म शिंदे सोबत होते
या वेळी अखिल भारतीय ढोर कक्कया समाज मंडळ आनंदवाडी बेळगाव आयोजित महाशिवरात्रि महोत्सवाच्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे हे कक्केरी येथे पहिल्यांदाच आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करत असताना ते म्हणाले स्वकर्तृत्वावर आपले लोक पुढे जात आहेत, अनेक लोक आमदार , खासदार,कलेक्टर, आई .जी .डी वाय एस. पी. सचिव झालेले आहेत, ते ही लाचारी न पत्करता या मोठ्या हुद्या पर्यतं आपल्या समाजातील लोक पुढे जात आहेत ,याचा मला अभिमान आहे, तसेच यानिमित्ताने काही साहित्यिक ,पत्रकार , संपादक ,वैचारिक प्रबोधन करणारे आपली लेखणी असो अथवा अभ्यासातून समाजाचे लोक कार्य करताना दिसत आहेत. तर आपण जन्माने गरीब कुटुंबात जन्मलो असलो तरी आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी लोक चामड्याचा व्यवसाय किंवा छोटे-मोठे मिळेल ती नोकरी करून स्वकर्तुत्वावर ही आपला समाज पुढे जात असताना मी बघतोय, कोल्हापूरचे हरिदास सोनवणे ,कुमार सोनवणे ,यांच्यासारखे लोक मोठमोठ्या कंपनी व्यवसाय औद्योगिक क्षेत्रांमध्ये ही समाजातील मंडळी प्रगती करीत आहेत. मला सांगावेसे वाटते मी कोर्टात चपराशी होतो हे मला सांगण्यासाठी साक्षीदार नेमावे लागतात. पण मी भारताचा गृहमंत्री, उर्जा मंत्री राज्यपाल ,मुख्यमंत्री, झालो व दोन ते अडीच वर्ष लोकसभेचा ही नेता होतो, पण मी स्वतः माझी जात विसरलो नाही. तर मला माझी जातच प्रिय आहे .
आपल्या समाजात एखादयावर अन्याय झाला म्हणून त्याच्यावर रागा राग न करता पुढे समाजाच्या विकासासाठी पुढे कार्य करत चला, मी उपदेश करणार नाही. पण हा सल्ला मात्र देत आहे. समाजातील मंडळी एकत्र आली पाहिजे. समाजाचा विकास व आपल्या कक्केरी व कक्कया स्वामींच्या स्मारका करिता जो प्रयत्न सुरू आहे. तो मी माझ्या सर्वतोपरी प्रयत्नातून व समाजातील उद्योजक, मोठ्या हुद्द्यावर असलेले समाजातील मंडळी यांच्या मदती तून आपण करुन घेऊया आणि हे करण्यासाठी सर्व एकत्र येऊयात.
. मला आणखीन अभिमान वाटतो आपल्या समाजातील माजी कष्टम आयुक्त ना. म. शिदे यांच्या सारख्या अभ्यासु साहित्यिकांच्या बरोबरच काही आपल्या समाजावर अभ्यास करून डॉक्टरेट होण्यासाठी वैशाली कटके सारख्या मुलीने धाडस केले आहे. याचाही मला आभिमाना सह कौतुक हे माझ्याबरोबरच समाजाचाही अभिमान वाढतोय .आपल्या कष्टावर विश्वास मनगटावर ताकत व प्रामाणिकपणा व श्रद्धा असेल तर माणूस नक्कीच पुढे जातो हे मी ठामपणाने सांगतोय. माझा सत्कार कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील गावातील तसेच महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश येथून आलेले समाजबांधव यांनी उस्फूर्तपणे केला या सर्वांचा सत्कार मी मनापासून स्वीकारतो.
१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या आदेशाने लिंगायत धर्म वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहचविणाऱे पैकी लढवय्या डोहर कक्कय्या हे ज्या ठिकाणी धारातीर्थी पडले ते कक्केरी ही त्याची समाधी असून त्यांच्या नावानेच त्या ठिकाणी “ कक्केरी “ हे गाव वसले आहे.
1 मार्च2022 रोजी गुरूमाता नंदाताई यांच्या बिरवळ्ळी जि. धारवाड येथील मठास भेट दिली. आपल्या समाजात गुरुमाता नंदाताई या त्यागी झालेल्या याचाही मला अभिमान आहे त्यांनी उभे केलेले मठ आरसीसी बांधकाम सुरू आहे. तेही पूर्ण करण्याकरिता माझ्यासह आपण समाज बांधव प्रयत्न करूयात तेथे ही संपुर्ण पंचक्रोशीतील बंधू भगिनीनी स्वागत केलेले पाहुन मी भाराऊन गेलो .
शरण कक्कय्या यांचे समाधी संस्थानच्या वतीने उभयतांचा सत्कार झाले. त्यावेळी श्री सुशीलकुमार शिंदे यानी समाजाशी हितगुज करीत मार्गदर्शन केले.
समारंभाच्या शेवटी संजय खरटमल,मार्डी सोलापूर यांच्या कक्कय्या दैनंदिनी कॅलेंडर , गणपती लक्ष्मण शिंदे,इचलकरंजी , कोल्हापूर यांच्या “ लोकहिरा “ साप्ताहिक तसेच चन्नवीर भद्रेश्वरमठ व रोहित सोनकवडे लिखीत “लढवय्या लोकनेता वचन रक्षक कक्कय्या “ पुस्तकाचे व विरभद्रआप्पा कालप्पा होटगी धारवाड यांनी तयार केलेली संत कक्कया जीवनपट उलगडणारे व्हिडीओ सीडी ही प्रकाशन सुशीलकुमार शिंदेजी, व सौ. उज्ज्वलाताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अनेक वर्षापासून कक्केरीला जाऊन शरण कक्कय्या स्वामीचे दर्शन घेण्याची इच्छा पुर्ण झाली. यांचे समाधान हे शिंदे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर तेजांकित झाले होते. १२ व्या शतकातील आपला लोकनेता कक्कय्या यांच्या दर्शनास २१ व्या शतकातील आपला लोकनेता सुशीलकुमार शिंदे आपल्या सौ उज्ज्वलाताई शिंदे यांच्या सोबत पहिल्यादां आले याचा आनंद व्यक्त करत महाशिवरात्रीची यात्रा सफळ संपुर्ण झाल्याचा आनंद उपस्थित प्रत्येक डोहर कक्कय्या समाज बांधवांच्या शब्द व देहबोलीतून व्यक्त होत होता.
तरी या कार्यक्रमात गुरुमाता नंदाताई, विठ्ठल पोळ, अरविंद घोडके, गुरुनाथ घोडके,सुरेश खंदारे ,शांतराज पोळ ,अर्जुनराव होटगी, प्रकाश निंबाळकर, शिवदास शिंदे ,संतु केशर महाराज, राजेश खंदारे ,प्रकाश सोनवणे,नियाज पटेल,सौ रतन यशवंत कक्कयाणवर, सौ चंद्रमाला शिवदास शिंदे, सौ रेणुका विठ्ठल पोळ ,शिवाजी पोळ ,राहुल सोनवणे,रमेश सोनवणे, पुण्याहून आलेले हनुमंतराव सोनवणे ,रायाप्पा कटके, मुंबईचे अशोक कटके, परशुराम पोळ, लक्ष्मीकांत होटगीकर, यांच्या पत्नी सौ अलका होटगीकर, संतोष सावनूर , हैदराबाद चे आंनद दरवेश ,यांच्यासह महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य ,आंध्र प्रदेश, येथून आलेले .असंख्य समाजातील प्रतिष्ठित समाज बांधव ,महिला बंधू ,भगिनी यांच्या उपस्थितीत महाशिवरात्री महोत्सव संपन्न झाला .या महोत्सवात वधू वर सूचक नोंदणी स्टॉल ,संत कक्कया व बसवन्ना ची पुस्तके चा स्टॉल लक्ष वेधून घेत होते. तसेच दुसऱ्या दिवशीच्या महाप्रसादाची व्यवस्था बेळगाव कमिटीने केले होते. तसेच बेळगाव ढोर समाज महिला कमिटीचे प्रमुख सौ अश्विनी प्रताप श्रेयस्कर यांनी 25 हजार रुपयांची देणगी दिली, कार्यक्रमातील पूर्ण मंडपाचे अल्पशा दरात आणि सुसज्ज असे मंडप हुबळी चे मंजुनाथ सोनवणे यांनी घातले. तर आलेल्या समाज बांधवांना फराळाची व्यवस्था तिपन्ना घोडके, यांनी केले लागेल तितके शुद्ध बिसलरी बॉटल पाण्याचे वाटप विशाल पोळ, व नटराज कटकधोंड यांनी केले ,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर श्रेयस्कर, तर सूत्रसंचालन विठ्ठल पोळ, व कांतराज पोळ यांनी केले तर आभार दिलीप घोडके यांनी मानले.
