8 मार्च आंतरराष्ट्रीय महिलांनी दिनानिमित्त सांगलीत कष्टकरी महिलांच्या नेत्या सुमन पुजारी यांचा निवारा भवन येथे जाहीर सत्कार

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिलांनी दिनानिमित्त सांगलीत कष्टकरी महिलांच्या नेत्या सुमन पुजारी यांचा निवारा भवन येथे जाहीर सत्कार


8 मार्च आंतरराष्ट्रीय महिलांनी दिनानिमित्त सांगलीत कष्टकरी महिलांच्या नेत्या सुमन पुजारी यांचा निवारा भवन येथे जाहीर सत्कार


कॉ सुमन पुजारी यांनी 1985 सालापासून कोल्हापूरमध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. त्या पदवीधर झाल्यानंतर 1990 मध्ये त्यांनी कॉ शंकर पुजारी यांच्याशी आंतरजातीय विवाह सत्यशोधकी पद्धतीने करून आंदोलनातील संसाराची सुरुवात केली.
बेघरना घरे मिळाली पाहिजेत या आंदोलनामध्ये त्यांना दोन वेळा जेलमध्ये जावे लागले. महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स युनियनच्या त्या राज्याच्या जनरल सेक्रेटरी आहेत.
16/8/ 2020 रोजी त्याना कॉविड झाल्यामुळे वीस दिवस भारती हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावे लागले. त्यानंतरही त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर सातत्याने उपचार चालू आहेत. सध्या त्यांची तब्येत झपाट्याने सुधारित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जमलेल्या कष्टकरी महिलांनी कॉ सुमन पुजारी यांचा सत्कार करून यापुढील काळातही त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये भागीदारी करावी अशा अपेक्षा महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळेस कॉ शंकर पुजारी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की. निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या आंदोलनामुळेच नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीचे विवाहास तारीख १/२/२०२२ पासून एक्कावन्न हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी अर्जाची पूर्तता करावी असे त्यांनी आवाहन केले. तसेच यानंतर बांधकाम कामगारांना सर्व योजनांचे लाभ मिळवून देण्याबरोबरच कल्याणकारी मंडळाची एक महत्त्वाची योजना नोंदीत बांधकाम कामगारांना घरकुल मिळणे यासाठी बांधकाम कामगारांनी घर मागणीचा अर्ज भरून आंदोलनाची तयारी करावी असे आवाहन केले. ज्या बांधकाम कामगारांनी घरकुलासाठी दोन लाख रुपये मिळण्याची मागणी केली आहे त्यांचे अर्ज तपासणी काम सांगली साहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडून जोमाने सुरू आहे.
मेळाव्यामध्ये अश्विनी कांबळे, रोहिणी खोत, सना मुल्ला, शुभांगी तोळे, रजनी कांबळे, आशा काळे, सुरेखा पाटील इत्यादींनी मेळाव्यामध्ये महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या सरचिटणीस प्रा. शरयू विशाल बडवे यांनी आभार मानले नंतर मेळावा समाप्त झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *