२१//३/२०२२ रोजी सांगली मराठा सेवा संघ सभागृह (सांगली सिव्हिल हॉस्पिटल पाठीमागे) येथे बांधकाम कामगारांचा भव्य मेळावा
.एकवीस मार्चचा मेळावा संघटित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शनिवार दिनांक 19 मार्च रोजी घेण्यात आली. या बैठकीमध्ये जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना संघटित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ शंकर पुजारी होते.मुंबई उच्च न्यायालय आदेशानुसार जिल्हयातील बांधकाम कामगार आणि सांगलीतील बेघरांना घरे द्या. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना घरे द्या यासाठी मेळाव्याच्या ठिकाणीं अर्ज भरून घेतले जाणार आहेत. मेळाव्यामध्ये नवीन नोंदनी अर्ज, नूतनीकरण अर्ज व सर्व प्रकारच्या लाभाचे अर्ज संधर्भात मार्गदर्शन केले जाईल.सांगली जिल्ह्यातील सध्या ग्रामीण प्रधानमन्त्री आवास योजने अंतर्गत वीस हजार पेक्षाही जास्त घरे मंजुर आहेत परंतू शासनाने या घरांच्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे ही योजना सांगली जिल्ह्यात अयशस्वी ठरली आहे.दरम्यान बांधकाम कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.मेळाव्याचे प्रमुख वक्ते – मिरजेत प्रधानमन्त्री आवास योजने अंतर्गत 260घरकुले बांधणारे बिल्डर श्री विनायक गोखले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री संदीप राजोबा, बांधकाम व्यावसायिक श्री विद्याधर पाटील. व मेळाव्याचे अध्यक्ष कामगार नेते कॉ शंकर पुजारी असणार आहेत.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ज्या तीस कल्याणकारी योजना घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबतची संपूर्ण माहिती मेलाव्या मध्ये देण्यात येणार आहे.तरी या महत्वपूर्ण मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करणारे पत्रक युनियनच्या सरचिटणीस प्रा. शरयू बडवे आणि संघटनेचे सचिव विशाल बडवे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सुमन पुजारी सना मुल्ला,अश्विनी कांबळे ,शितल मगदूम , लक्षी कारंडे, शुभांगी गावडे, देविदास राठोड, परवीन मुजावर इत्यादींनी मेळाव्यामध्ये आपली भूमिका मांडली.