देशात तब्बल चाडेचार महिन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दराचा भडका उडाला आहे. पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महागले आहे. वाढीव दर मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून लागू झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96 रुपये 21 पैसे तर डिझेलचा दर 87 रुपये 47 पैसे झाला आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 110 रुपये 77 पैसे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 94 रुपये 94 पैसे इतका आहे. आधी पेट्रोल 109 रुपये 98 पैसे तर डिझेल 94 रुपये 14 पैसे प्रतिलिटर दराने विकले जात होते. राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत 110 रुपये 53 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 93 रुपये 35 पैसे प्रतिलिटर आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंधनाचे दर वाढतील, असे संकेत देण्यात आले होते. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कसे पाहाल?
देशभरातील प्रमुख शहरातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही Indian Oil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करु शकतात. येथे तुम्हाला दररोज अपडेट्स मिळतील.
त्याचबरोबर तु्म्ही इंडियन ऑईलची अधिकृत वेबसाईट https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx वर पेट्रोल-डिझेलचे दर चेक करू शकतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) SMS द्वारे देखील माहित करू शकतात. RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर SMS पाठवावा.