डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या डागडुजीस प्रत्यक्ष प्रारंभ कामाची पाहणी मा उपनगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाला यश

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या डागडुजीस प्रत्यक्ष प्रारंभ कामाची पाहणी मा उपनगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाला यश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या डागडुजीस प्रत्यक्ष प्रारंभ कामाची पाहणी मा उपनगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाला यश
इचलकरंजी येथील स्टेशन रोड वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची संपूर्ण डागडुजी रंगरंगोटी 14 एप्रिल पूर्वी करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष रवी साहेबजी रजपूते यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली होती त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भोवती असणाऱ्या फरश्या बदलण्यासह रंगरंगोटी च्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला आहे या कामाची पाहणी आज मा उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्यासह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली

दरम्यान इचलकरंजीतील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे न्यायालयासमोर आणि कामगार चाळ या ठिकाणी पुतळे आहेत तिथेही रंगरंगोटी सह डागडुजी तसेच लाइटची व्यवस्था करण्याची मागणी रवी रजपूते यांनी केली होती ….
तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदींसह अन्य राष्ट्रीय महापुरुषांच्यापुतळ्यांची साफसफाई रंगरंगोटी अन्य अनुषंगिक दुरुस्ती तात्काळ केली जावी अशी मागणी
रवी रजपूते यांनी केली होती
त्यानुसार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या डागडुजीस प्रारंभ झाला आहे या कामाची पाहणी रवी राजपूत यांनी केली तेव्हा पालिकेचे उपनगरअभियंता प्रवीण बेले, मक्तेदार पुजारी, अविनाश कांबळे, रोहित रजपुते, झाकीर जमादार ,अमर पारडे ,अमर कांबळे, मामा वराळे अभिजीत चव्हाण,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची दैनंदिन देखभाल पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पाण्याची नितांत गरज असल्याचे लक्षात आल्यावर भगतसिंग उद्यानातून 24 तास पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही यावेळी रवी रजपुते यांनी पलिकेकडे केली तेंव्हा पालिका अधिकाऱ्यांनी ही मागणी तत्वतः मंजूर केली

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *