रत्नागिरी : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सिक्युरिटी मधील तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे.
मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात घडला. प्रोटोकॉलनुसार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. दरम्यान, ताफ्यातील एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात घडला आहे. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षीत आहेत, अशी माहिती समजत आहे.