मातोश्रीवरून फोन येताच कोल्हापुरात राजकीय चक्रं फिरली, वंचितच्या उमेदवाराचा मोठा निर्णय

मातोश्रीवरून फोन येताच कोल्हापुरात राजकीय चक्रं फिरली, वंचितच्या उमेदवाराचा मोठा निर्णय

कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारीवरून चर्चेत असलेले हाजी अस्लम सय्यद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत हातकलंगले मतदारसंघातून सय्यद यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढताना त्यांनी ८० हजार मते घेतली होती.
माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव उमेदवार आहेत. चंद्रकांत जाधव यांचे समाज कार्य पुढे नेण्यासाठी जयश्रीताई उभारल्या आहेत. समाज सेवेच्या भावनेतून त्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्यामुळे त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे, असे हाजी अस्लम सय्यद यांनी सांगितले.

हाजी अस्लम सय्यद यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका निर्माण झाला होता. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दखल घ्यावी लागली. सय्यद यांच्याशी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. यावेळी अस्लम सय्यद यांनी बहुजन समाजाची कामे होत नसल्याने आपण समाजाला न्याय देण्यासाठी या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत असे सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना भविष्यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

तसेच या निवडणुकीत माघार घेण्याचे आवाहन केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्यामुळे अस्लम सय्यद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ मधले लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघघात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत ८० हजार मते घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. सय्यद यांची उमेदवारी या मतदारसंघात शिवसेनेचे पथ्यावर पडली होती. शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार म्हणून निवडून आले. सय्यद यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघ अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी समोर मतविभाजनाचा मोठा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी थेट शिवसेनेनेच डॅमेज कंट्रोल केल्याने महाविकास आघाडीचा फायदा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *