
28/ 29 मार्च देशव्यापी संपा निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक महिलांचा 29 मार्च रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.
शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामधील मागण्या — भारत सरकारने 44 कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड लादण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे तो त्वरित बंद करावा. आणि चार लेबर कोड रद्द करावेत.
देशांमधे चार 4 लेबर कोड अमलात आल्यास देशातील कामगारांचे कायदेशीर हक्क धोक्यात येणार आहेत आणि मालक कामगारांना गुलामासारखे राहून घेण्याचा धोका तयार झालेला आहे. त्यामुळे आज कामगारांना जे किमान लाभ मिळत आहेत ते लाभ मिळणे सुद्धा बंद होणार आहेत. म्हणूनच देशातील सर्व कामगारांनी दोन दिवस काम बंद ठेवून संप केला आहे.
सध्या देशामध्ये आठ लाख आशा व गटप्रवर्तक महिला काम करीत आहेत. मागील दोन वर्षापासून देशांमध्ये kovid कोविद् महामारी विरोधी संघर्षात आशा व गटप्रवर्तक महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी केलेली आहे.म्हणुनच सन 2005 सालापासून देशांमध्ये काम करणाऱ्या आठ लाख आशा व गटप्रवर्तक महिलांना भारत सरकारने त्वरित कायम कर्मचार्याचा दर्जा द्यावा तोपर्यंत त्यांना दरमहा पंचवीस हजार रुपये किमान वेतन देण्याचा निर्णय करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
सध्या महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय यंत्रणा जिल्हा सारखे दाबून घेत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान ना मार्फत व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लोकांच्या पर्यंत जाऊन उपचार करणे तपासणी करण्याची संपूर्ण जबाबदारी अशा व गटप्रवर्तक महिलांच्या मला दिली आहे त्यांच्याकडून सर्व कामे सक्तीने करून घेतले जात आहेत अशांना दररोज बारा-बारा तास काम काम करावे लागत लागत आहे ही वेळ भिकारी ताबडतोब थांबली पाहिजे व अशांना सन्मानाची वागणूक मिळून त्यांच्याकडून आठ तासांपेक्षा जास्त काम करून घेता कामा नये आणि त्यांना पंचवीस हजार रुपये किमान उत्तर मिळाली पाहिजे असे दर्शनाच्या वेळेस झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक युनियनचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खालील प्रमाणे महिलांनी जोरदार घोषणा दिल्या.केंद्र सरकारने संमत केलेले कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करा, वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या वाढत्या किमती कमी करा, बेरोजगारी कमी करा , देशातील असंघटित उद्योगातील सर्व कामगारांना दरमहा किमान वेतन 25 हजार रुपये द्या या घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी, विद्या भालेकर पल्लवी पारकर तनुजा कांबळे, नम्रता साळवी, साधना लिंगायत, श्वेता सप्रे, रूपाली मांगले, शुभांगी चव्हाण, वेदिका गडदे इत्यादींनी केले.