वारसा हक्काने पालिका सेवेत पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मा, उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांचे प्रयत्न यशस्वी
इचलकरंजी –
येथील नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात आज पाच सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्तीचे आदेशपत्र कामगार अधिकारी श्री विजय राजापुरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
मा,उपनगराध्यक्ष रवी रजपुते यावेळी उपस्थित होते .
या पाच पात्र उमेदवारांची वारसा हक्काने पालिका सेवेत नियुक्ती केली जावी यासाठी रवी रजपुते यांनी विशेष प्रयत्न केले होते , वारसा हक्काने सेवेत रुजू होण्यासाठी राज गुलफागे , सागर तडाखे , कविता तडाखे या कर्मचाऱ्यांना आदेशपत्र दिले
दरम्यान यावेळी रवी रजपुते म्हणाले पालिका कर्मचाऱ्यांना न्याय हक्कांसाठी मी पुर्वीपासून लढत आहे , यापुढेही त्यांच्यासाठी सहकार्य व मदत करणार आहे , पालिका कर्मचऱ्यानी त्यांच्या मूलभूत हक्कसाठी कोणतेही अडचण आल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन रजपूते यांनी केले…
नियुक्ती पत्र कामगार अधिकारी श्री विजय राजापुरे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले त्यावेळी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक पोवार सर उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
वारसा हक्काने पालिका सेवेत पाच कर्मचाऱ्यांची नियुक्तीमा, उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांचे प्रयत्न यशस्वी
