अकिवाट माणुसकी फौंडेशनच्या वतीने ई-श्रम कार्ड शिबीर संपन्न
संयुक्त जयंतीच्या निमित्ताने समाज उपयोगी उपक्रम

माणुसकी फौंडेशन अकिवाट शाखेच्या वतीने समाजातील असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले. प.पू. 1008 भगवान महावीर, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ही शिबीर आयोजित करण्यात आले होते.
असंघटित कामगारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना सरकारी आणि सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देणे, हे या शिबीरामागचे मुख्य उद्देश. ज्या कामगारांचा अधिकृत कोणत्याही संघटनेत समावेश नाही ते असंघटित कामगार होय. अगदी लहान शेतकरी-शेतमाजूरापासून ते विडी कामगार ,हातगाडी ओढणारे ,वीटभट्टी कामगार, सुतार ,बांधकाम कामगार, फळ विक्रेते आणि इतर घटकांचा या असंघटित कामगारांमध्ये सहभाग होतो. या सर्व कामगारांची या शिबिराच्या माध्यमातून शासन दरबारी नोंद करण्यात आली. प्रत्येक कामगाराला UAN नंबर देऊन त्यांना ई-श्रम कार्ड प्रदान करण्यात आले.
या नोंदणीमुळे कामगारांसाठी संकटाच्या काळात सरकार कडून मिळनाऱ्या मदतीचा लाभ घेणे अधिक सूरळीत होणार आहे. तसेच विविध सामाजिक लाभ मिळणे ही सोयीस्कर होणार आहे. गाव व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अकिवाट येथील सनदी न्यू बिल्डिंग येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यकामाची प्रस्तावना जेष्ठ पत्रकार गणपती कागे यांनी केली. कार्यक्रमाला माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.रवी जावळे, माजी जि.प.सदस्य इकबाल बैरगदार,शाखाध्यक्ष रमेश कांबळे, ग्रा.प. सदस्य अविनाश रायनाडे, बंटी रायनाडे, संदीप नरवाडे आणि माणुसकी फौंडेशनचे सर्व सदस्य तथा नागरिक उपस्थित होते. हेमंत कांबळे यांनी आभार प्रदर्शनाची भूमिका पार पाडली.