रोहित लोखंडे यास ‘उत्कृष्ठ अभिनेता’ पुरस्कार
इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजीतील उदयोन्मुख कलाकार रोहित प्रकाश लोखंडे यास विविध मालिका, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच मराठी चित्रपटातील अभिनय कामगिरीबद्दल राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार सोहळ्यात ‘उत्कृष्ठ व आदर्श अभिनेता’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रोहित लोखंडे याला लहानपासूनच अभिनय आणि कुस्तीची आवड आहे. त्याने आजवर अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन बक्षिसेही मिळविली आहेत. इस्लामपूर, आजरा आणि हातकणंगले येथील कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदकही मिळविले आहे. कुस्तीबरोबरच त्याला अभिनयाची आवड असून विविध टिव्ही मालिका, वेबसिरीज तसेच काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. या उदयोन्मुख कलाकाराची दखल घेऊन मुंबई येथे संपन्न सोहळ्यात राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री पद्मजा खटावकर, उद्योजिका र्डा. सुमित्रा पाटील, दत्तात्रय पाटील, भरतनाट्य गुरु ग्लोरी अरोकियत, पत्रकार विक्रम शिंगाडे, अॅड. प्रिती हट्टीमणी आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार रोहित लोखंडे याला प्रदान करण्यात आला. यामध्ये रोहित याला त्याचे आई-वडील, नातेवाईक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. या यशाबद्दल रोहित याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Posted inकोल्हापूर
रोहित लोखंडे यास ‘उत्कृष्ठ अभिनेता’ पुरस्कार
