महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद, कोल्हापूर जिल्हाच्यावतीने राणा दाम्पत्यांची पदे रद्द करणेकरिता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले
इचलकरंजी दि.26.संसद सदस्य नवनीत राणा व विधिमंडळ सदस्य रवी राणा यांची पदे रद्द करण्याबाबत महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद जिल्हा कोल्हापूर यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की राणा दांपत्यांनी संविधानाची शपथ घेऊन पदग्रहण केले आहे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक उन्मादाने विशिष्ट धर्माचा पुरस्कार करून संविधानानुसार घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे संविधानातील सरनाम्यातील धर्मनिरपेक्षतेचा भंग करून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असून लोकप्रतिनिधींचे कर्तव्य पायदळी तुडवले असे लोकप्रतिनिधींचे वर्तन असेल तर सामान्य जनतेचा संविधानावरील प्रेम व आदर राहणार नाही राणा दाम्पत्यां वरील जामीनाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अशी टिप्पणी केली आहे की पदावर असणाऱ्या व्यक्तीने विशेष करून लोकप्रतिनिधींनी एकमेकांना विषयी आदराने बोलावे आणि वागावे अशी न्यायालयाने अपेक्षा व्यक्त केली आहे परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करत आहेत याप्रकरणी लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा करणे चुकीची आहे अशी टिप्पणी करून राणा दांपत्याचे वर्तन लोकशाहीला मारक असल्याचे स्पष्ट केले आहे संविधानाची शपथ घेऊन धर्मवाद आणि जातिवाद याचा सार्वजनिक ठिकाणी पुरस्कार करण्याचा लोकप्रतिनिधींना कोणताही अधिकार नाही असे वर्तन झाले तर देशाचे सार्वभौमत्व व अखंडत्व धोक्यात येईल त्यांच्या या संविधानाचा द्रोह करण्याच्या कृत्याबद्दल महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद जिल्हा कोल्हापूर यांचेवतीने पद रद्द करण्याची मागणी केली जर त्यांची पदे रद्द केली नाहीतर नाईलाजास्तव संघटनेच्यावतीने त्यांची पदे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा देण्यात आला.सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्वीकारले.यावेळी
अध्यक्ष प्रमोद कदम,प्रा अशोक कांबळे सरचिटणीस रणजित केळुस्कर उपाद्यक्ष जयसिग कांबळे उपाद्यक्ष मुरली कांबळे उपाद्यक्ष प्रदीप कांबळे,सचिव प्रशांत खांडेकर सहसचिव युवराज जाधव,सचिव सागर जमने,सचिव शितल कांबळे,सचिव गौतम दिवाण,सचिव
सल्लागार डी एस ढोणे,सल्लागार किरण कांबळे सल्लागार अनिल कांबळे ,सल्लागार नंदू शिंगे,सल्लागार दादासो गायकवाड ,सल्लागार एस आर कांबळे सल्लागार अशोक हातकलंगडेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.