मांजर समजून चिमुकलीने घरी आणला बिबट्याचा बछडा

मांजर समजून चिमुकलीने घरी आणला बिबट्याचा बछडा

मांजर समजून चिमुकलीने घरी आणला बिबट्याचा बछडा

बिबट्या म्हटलं तरी घाम फुटतो पण नाशिकमध्ये एका शेतकऱ्याच्या चिमुकलीने चक्क मांजर समजून बिबट्या घरी आणला, इतकंच नाहीतर घरातल्या चिमुकल्यांनी त्याच्यासोबत मैत्रीही केली,याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

बिबट्या आला’ असं जरी ऐकलं तरी अंगाला घाम फुटतो. अशात बिबट्याने हल्ला केल्याची तर कल्पनाच करायला नको, पण मालेगावातील एका शेतकरी कुटुंबाने वाट चुकलेल्या बिबट्याच्या बछड्याला तब्बल आठवडाभर मांजराचं पिल्लू समजून सांभाळले.

मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिल्ला सारखे दिसणारे पिल्लू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलांनी त्याच्यासोबत मैत्री केली. मात्र, हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे असल्याचं कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना घाम फुटला.

सावधगिरी बाळगत आणि बछड्याला मायेची उब देत त्यांनी बिबट्याच्या बछड्याला दररोज दीड लिटर दूध पाजले. इतकेच नाहीतर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेऊन जाईल, अशी देखील काळजी घेतली. मात्र, वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घाययला आली नाही. त्यामुळे अखेर या चिमुकल्या बछड्याला वनविभागाकडे सोपवण्यात आलं आहे. यावेळी शेतकरी कुटूंबाला देखील गहिवरून आले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *