‘कामाच पाठपुरावा कसा करावा हे रमेशकुमार मिठारे यांच्या कडुन शिकावं ‘
शिरोळ
रमेशकुमार मिठारे हे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असुन मिडीयाच्या माध्यमातुन पतसंस्था कर्मचारी यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती केली व त्यांच्या पाठपुरावा मुळे तालूक्यातील बऱ्याच संस्थेचे प्रश्र सोडविला आहे.पतसंस्था टिकल्या पाहीजेत यासाठी नियामक मंडळाच्या जाचक अटी रद्द व्हावेत यासाठी पाठपुरावा करत आहेत.कर्मचारी यांना सेवानियम लागू करावा यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न आहेत.एवढेच नव्हे तर आपल्या कार्यालयास पतसंस्थेकडून वेळोवळी मागिलेली माहीती संकलन करणे सोईचे झाले आहे.मिठारे यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हे कौतूकास्पद आहे.आमच्या कार्यालयाकडून जे काम होत नाही ते त्यांनी संघटनेच्या माध्यमातून करत आहेत.एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा हे त्यांच्या कडून शिकावं असे गौरव उद् गार शिरोळ तालुक्याचे सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांनी सत्कार सोहळाप्रसंगी काढले.
नुकताच पुणे येथे रमेशकुमार मिठारे यांना संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बद्दल,महाविर पतसंस्थेचे जनरल सेक्रेटरी-राजगोंडा हांजे यांची सेवानिवृत्ती , तेजपाल मुदकान्ना यांची सीईओ पदी बढती तर महेश पतसंस्था घोसरवाडचे मॅनेजर कमते मॅडम यांना मिळालेला पुरस्कार या सर्वाचा सत्कार सहायक निबंधक सहकारी संस्था शिरोळ वतीने शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमास कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष-संजय कुंभोजे, जनरल सेक्रट्ररी- जयपाल नाईक,खजिनदार-संजय पाटील, संचालक-सुभाष शिरगांवे, बाबासाहेब पाटील, राजेंद्र खोकाटे, संचालिका-कांचन लाड,भारती मोरे व तालुक्यातील पतसंस्था सेक्रेटरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार परमानंद उदगांवे यांनी मानले