राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पूर्वतयारी पंच परिक्षा व कार्यशाळा बोधी मग्गो विहार ईसासनी हिंगणा येथे संपन्न
रजत डेकाटे // नागपूर जिल्हा प्रतिनिधी
हिंगणा (नागपूर) दि. २६ मे २०२२ गुरुवार
नागपूर:- शोतोकान राष्ट्रीय कराटे क्रीडा हैदराबाद येथे 4 ते 5 जून दरम्यान होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 51 मास्टर्स व 200 कराटेचे खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. शिहान संजय इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हि टिम 3 जूनला हैदराबाद ला रवाना होणार आहे.
हैदराबाद येथे इंनडोर स्टेडियमवर साऊथ सुपर स्टार विजय रेड्डी हे या स्पर्धेत विषेश अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे. या स्पर्धेत भारतातील सर्व राज्य व तसेच 2000 हजारांहून अधिक कराटे क्रीडा खेळाडू विद्यार्थ्यांची संख्याबळ, व त्यांच्या खाण्याच्या, व राहण्याची सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. व तसेच निश्चित करण्याचा माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पूर्वतयारी म्हणून पंच परिक्षा व कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या या बाबत माहिती शिहान संजय इंगोले, व त्यांच्या टिमच्या सर्व मास्टर्स, प्रशिक्षक, कोच, व सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यशाळा बोधी मग्गो विहार ईसासनी भंते भदंत नागदिपंकर सथवीर, व विहाराच्या सर्व अनुयायांना मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी पालकवर्ग, क्रीडा प्रेमी, जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यशाळा सेंन्सई घनश्याम खत्री, सेंन्सई पांड्या, सेंन्सई अविनाश इंगोले, सेन्सई प्रणय भोंगले, देवेश कटरे, पराग मुळे, पराग सलामे, राहुल मते, मनिष बुरडीकर, श्याम वर्मा, सेन्सई राहाटे सर, क्रीडा मार्गदर्शक हिंगणा सतीश भालेराव, शिवांत मनोहरे आदी उपस्थित होते.