डाव्या पक्ष व कामगार संघटनांच्या वतीने वतीने आज सांगली स्टेशन चौकात जोरदार निदर्शने..

डाव्या पक्ष व कामगार संघटनांच्या वतीने वतीने आज सांगली स्टेशन चौकात जोरदार निदर्शने..

डाव्या पक्ष व कामगार संघटनांच्या वतीने वतीने आज सांगली स्टेशन चौकात जोरदार निदर्शने..

सतत नवनवे उच्चांक गाठत असलेल्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोट्यावधी लोक दारिद्र्यात ढकलले जात असून त्यांची उपासमारीने तडफड होऊ लागली आहे. बेरोजगारीने कळस गाठला असताना गरिबांना दैन्याच्या खाईत ढकलले जात आहे. म्हणुन आज स्टेशन चौकात डाव्या पक्षांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली

गेल्या वर्षभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, स्वयंपाकाच्या तेलाच्या २३ टक्के, डाळीच्या ८ टक्के वाढल्या आहेत. भारतीयांच्या दैनंदिन आहारात आवश्यक असलेला गहू १४ टक्क्यांनी महाग झाला आहे. या सर्व पदार्थांचे दर सामान्य माणसांना परवडण्याच्या पलिकडे गेले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून करायची गव्हाची खरेदी कमी होऊन ती निम्म्याहून खाली आली आहे. केंद्र सरकारचे या वर्षीचे ४.४४ कोटी टन गहू खरेदीचे उद्दिष्ट होते, ते २ कोटी टनही होणार नाही.

पेट्रोलियमचे पदार्थ आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सतत होणारी वाढ आणि गव्हाची टंचाई यामुळे महागाई नवनवे शिखर गाठत आहे. त्यात कोळसा टंचाईच्या बातम्यांमुळे विजेचे दरही वाढत आहेत.

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थांवरील सेस आणि सरचार्ज कमी करून विशेषतः स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेतली पाहिजे, अशी मागणी डावे पक्ष करत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून गहू पूर्ववत मिळाला पाहिजे. या दरवाढीला आळा घालण्यासाठी रेशन व्यवस्था मजबूत केली पाहिजे.

यासाठी डावे पक्ष खालील मागण्या करत आहेत:

१. पेट्रोलियम पदार्थांवरील सर्व प्रकारचे सेस/सरचार्ज मागे घ्या.
२. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्ववत करा.
३. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे.
४. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा रु. ७,५०० हस्तांतरित करा.
५. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा.
६. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा.
७. शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा.
८. सर्व रिक्त जागा त्वरित भरा.

या निदर्शनावेळी आयटक कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते कॉ शंकर पुजारी भाकपचे कॉम्रेड कुमार लोहार, महादेव कांबळे,कॉ उमेश देशमुख, कॉ. कुमार लोहार, कॉ. रेहाना शेख, कॉ. वसंत कदम, कॉ. दिलशाद टिनमेकर, कॉ. किशोर केदारी, कॉ. राहुल जाधव कॉ. वर्षा गडचे, कॉ. जोहरा नदाफ इ. उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *