पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कबनूर मधील विविध संस्थामार्फत नालंदा परिसर समाज मंदिर कंपाउंड कबनूर येथे १०० झाडांचे वृक्षारोपण

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कबनूर मधील विविध संस्थामार्फत नालंदा परिसर समाज मंदिर कंपाउंड कबनूर येथे १०० झाडांचे वृक्षारोपण

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कबनूर मधील विविध संस्थामार्फत नालंदा परिसर समाज मंदिर कंपाउंड कबनूर येथे १०० झाडांचे वृक्षारोपण
कबनूर-(प्रतिनिधी चंदुलाल फकीर)कबनूर ग्रामपंचायत कबनूर,महिलांची झाडांची भिशी, शांतिनाथ पतसंस्था व इंदिरा महिला पतसंस्था यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 5 रोजी नालंदा परिसर समाज मंदिर कबनूरच्या कम्पाऊंडमधील आवारात ग्रामपंचायत व  स्वामी ग्रुप मार्फत शंभर खड्डे खणून मातीसह तयार करून घेतलेले होते. कबनूर येथील सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कबनूर मधील शांतिनाथ पतसंस्था यांचेमार्फत ५० झाडे व इंदिरा महिला पतसंस्थेचे मार्फत ५० झाडे असे १०० झाडे देण्याबाबत महिला मंडळाने आव्हान केले होते त्याप्रमाणे दोन्ही संस्थेमार्फत पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कबनूरमध्ये  कबनूरचे ज्येष्ठ नेते पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम.पाटीलसाहेब, सरपंच शोभा पोवारमॅडम, उपसरपंच सुधीर पाटील, सदस्य मधुकर मणेरे, समीर जमादार,सुधीर लिगाडे, रजनीताई गुरव, पाटील वहिनी, कट्टी वहिनी, मिलिंद कोले, डॉक्टर मिता पाटील,मंगल काडाप्पा, स्वाती कोले, अशोक पाटील, सुभाष काडाप्पासर,  बाळासाहेब केटकाळे,रमेश केटकाळे, बबन केटकाळे, फरांडेसर शिंगेसर,कांबळेसर, खांडेकरसर स्वामी ग्रुपचे विवेक स्वामी व त्यांचे पदाधिकारी आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
    इचलकरंजी मधील महिला डॉक्टर,वकील,उच्चशिक्षित व सामाजिक कार्यकर्त्या अशा ६० महिला एकत्र येऊन डॉक्टर ज्योती बडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची झाडाची भिशी  ही संकल्पना घेऊन महिला मंडळ यांच्यामार्फत दरमहा गुगलपे द्वारे प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे जमा होणाऱ्या  रकमेतून  प्रत्येक महिन्याच्या  महिनाअखेरीस शेवटच्या दहा दिवसांमध्ये नियोजित भागांमध्ये विविध वृक्षांचे रोपण करतात व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतात पाच ते सहा फुटाची तयार झाडे लावली जातात त्यामुळे बहुतांश झाडे टिकलेले आहेत या महिला मंडळाचा  बियाणे बँक काढण्याचा संकल्प आहे .
         सदर कार्यक्रम प्रसंगी झाडांचे भिशी महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर ज्योती बडे,शांतिनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, इंदिरा महिला पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर मिता पाटील यांचा ग्रामपंचायत मार्फत झाडाचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डॉक्टर कोळी मॅडम, उपसरपंच सुधीर पाटील,ज्येष्ठ नेते अशोक पाटील सरपंच शोभा पोवारमॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. याचं कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी विठ्ठल यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना झाडाचे रोप देऊन वाढदिवसाच्या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
   कार्यक्रमास ग्रामपंचायत मौजे कबनूरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी, झाडांची भिशी महिला मंडळाचे सर्व सदस्य, शांतिनाथ पतसंस्था व इंदिरा महिला पतसंस्थाचे पदाधिकारी, कबनूर मधील विविध मंडळ व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ,नालंदा परिसर समाज मंदिरचे पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *