निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण शंका समाधान
यावर युट्यूब लाईव्ह सेशन संपन्न

निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण शंका समाधान<br>यावर युट्यूब लाईव्ह सेशन संपन्न

निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण शंका समाधान
यावर युट्यूब लाईव्ह सेशन संपन्न
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत सतत प्रश्न विचारले जात होते या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथील उपसंचालक (आय. टी व प्रसार माध्यम) विकास गरड सरांनी युट्यूब लाईव्ह सेशन आयोजित केले होते व याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षकांना झाला.

बुधवारी ८ जुन २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता
https://youtu.be/DTY2B_DQZKk या लिंकवर प्रशिक्षणार्थी साठी शंका समाधान चर्चा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षणासाठी 94000 पेक्षा अधिक शिक्षकांनी नाव नोंदणी केली आहे. अशा प्रकारचे आँनलाईन प्रशिक्षण राज्यातील शिक्षकांसाठी पहिल्यांदाच होत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे प्रशिक्षणात अडथळे निर्माण झाले होते. प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून पाहिजे अशी मागणी शिक्षक संघटना व शिक्षकांनी केली होती व ती मागणी मान्य करून शिक्षकांनी लाँगिन केल्यापासून 45 दिवसात हे प्रशिक्षण पुर्ण करण्याची मुभा आता देण्यात आली आहे अशी माहिती उपसंचालक विकास गरड यांनी दिली. पुर्वी हे प्रशिक्षण 30 दिवसात पुर्ण करणे आवश्यक होते. सदर प्रशिक्षण शिक्षकांनी पुर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. ज्या शिक्षकांना पासवर्ड व लाँगिन आयडी संदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या दुर करण्यासाठी आजचे उद्बोधन फारच फलदायी ठरले अशी इच्छा अनेक शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
अशा प्रकारचे प्रशिक्षण पहिल्यांदाच होत असल्याने उत्सुकता, दडपण अशा संमिश्र भावना होत्या. शिक्षक आपल्या सोयीनुसार व वेळेनुसार प्रशिक्षण पुर्ण करतील असा विश्वास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *