⭕ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल राहणार उपस्थित
रत्नागिरी : ग्रामीण भागात अग्रेसर असणारे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मुक्त समाज माध्यम म्हणून ओळखले जाणारे ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचा तृतीय वर्धापन दिन येत्या ११ जून ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागतल्या समस्या सोडवण्यासाठी कायम या डिजिटल मीडियाने आपले योगदान दिले आहे.
लोकांच्या समस्या योग्य पद्धतीने मांडून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामीण वार्ता हे ग्रामीण भागात कायम अग्रेसर राहिले आहे.ग्रामीण भागातले आज ही प्रश्न कायम आहेत.त्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम ग्रामीण वार्ताने कायम केले आहे.ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्या,रस्त्याच्या समस्या,आरोग्य समस्या अशा विविध समस्यांवर उजेड टाकून त्या प्रकाश झोतात आणल्या आहेत.अनेक वेळा शासन दरबारी ग्रामीण वार्ताच्या बातम्यांची दखल सुद्धा घेतली गेली आहे.अल्पावधीतच ग्रामीण वार्ता हे डिजिटल माध्यम ग्रामीण भागात दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले.ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळाले.
ग्रामीण वार्ता या डिजिटल मिडीयाला येत्या ११ जून ला ३ वर्षे पूर्ण होत आहेत.याचेच औचित्य साधुन वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संपादक मुझम्मील काझी यांनी दिली आहे.
या वर्धापनदिनानिमित्त ‘ग्रामीण भागाचा रखडलेला विकास आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाच्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. आणि ग्रामीण वार्ता डिजिटल मीडिया नव्याने सुरू करत असलेल्या ‘डिजिटल ग्रामीण रेडिओ’ चे सुद्धा या वेळी प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि मा.उपाध्यक्ष,मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबईचे
मा.श्री.विजयकुमार बांदल सर हे उपस्थित राहणार आहेत.तसेच गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,गाव विकास समितीचे संघटन प्रमुख व पत्रकार सुहास खंडागळे,पत्रकार जान्हवीताई पाटील,पत्रकार अलीमिया काझी,पत्रकार मुख्तार राजापकर हे उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम ११ जून ला सकाळी १० वाजता मोक्ष गुडंम विश्वश्वरैय्या सभागृह, शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
तरी सर्व वाचकवर्ग,पत्रकार बंधू, मित्रपरिवाराने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संपादक मुझम्मील काझी यांनी केले आहे.