सांगली आयटक कामगार संघटनेच्या वतीने सांगली निवारा भवनमध्ये थोर समाज सुधारक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार Aituc फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, भारतामध्ये सर्वप्रथम लोकराजा शाहू महाराज यांनी शालेय शिक्षणासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ५०,% राखीव जागेची तरतूद करून त्याची अंमलबजावणी केली. त्याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांच्या साठी कोल्हापूर मध्ये बोर्डिंग सुरू करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे शेक्षणिक सहकार्य केले. राधानगरी येथे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये धरण बांधून मजबूत धरण आणि कोल्हापूर बंधारे पॅटर्न सुरू केले. राजश्री शाहू महाराज यांनी हिंदुत्ववादी धर्मांध व अंधश्रद्धा पसरवणारे प्रंवृत्ती विरुद्ध सातत्याने संघर्ष केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भविष्यकालीन कर्तृत्व लक्षात घेऊन शंभर वर्षांपूर्वी त्यांनी माणगाव येथे परिषद घेतली. या ऐतिहासिक परिषदेनंतर सर्व जगासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व फुलून आले. म्हणूनच या देशातील आजचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा राजश्री शाहू महाराजांच्या विधायक कार्याचा आपण अभ्यास करून धर्मनिरपेक्ष जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कोल्हापूर संस्थान मध्ये जे पालक स्वतःच्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोठावणारा पहिला राजा. कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धावर प्रहार करणारा राजा, विधवा पुनर्विवाहचा महत्त्वाचा कायदा करणारा राजा. मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा निर्णय करणारा राजा, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारा राजा, असे निर्णय घेणारे लोकराजा शाहू महाराज हे सामाजिक दृष्ट्या दूरदृष्टी ठेवून कार्य केलेले देशातील वैशिष्ट्यपूर्ण राजे आहेत.
राजश्री शाहू महाराजांना वंदन करण्यासाठी कॉ शंकर पुजारी, कॉ सुमन पुजारी, पुष्पा साळोखे कॉ शिराज शेख,नंदिनी कामते व अश्विनी कांबळे इत्यादी उपस्थित होते.