शिंदे गटात आणखीन एक उच्च मंत्र्यांचा उदय.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेने मध्ये व महाविकास आघाडीच्या सरकारात मोठा राजकीय भूकंप झाला. दोन्ही गटातील नेत्यांना एकीकडे राजकीय लढाई करताना कायदेशीर लढाई करावी लागणार आहे. शिवसेना नेत्यांनी आता रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे.अत्यंत संयमी, धिरोदत्त, शांत व्यक्तिमत्व असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. बागी आमदारांचा विधानभवनामध्ये जाणार रस्ता वरळी म्हणजे माझ्याच मतदारसंघातून जातो आणि त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल या बातमीने राज्यात खळबळ माजलेली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजच रुग्णालयातून घरी आले. कोरोनामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून आज राजभवन मध्ये दाखल होताच राज्यपाल “अँक्शन “मोड मध्ये आले आहेत. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांना राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. तर दुसरीकडे काल राष्ट्रीय कार्यकारिणीची शिवसेनेची बैठक सेना भवन येथे झाली आणि ती बैठक संपल्यानंतरl तणाव सदृश्य परिस्थिती पुऱ्या महाराष्ट्र मध्ये झाली. अनेक बागी आमदार यांच्या कार्यालयावर हल्ले झाले. मुंबईमध्ये दिलीप लांडे व सदा सर्वणकर यांच्या कार्यालयावरती हल्ले करण्यात आले. पुण्यातील आमदारांचे कार्यालय फोडून टाकण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आता तिथे केंद्राने अतिरिक्त सुरक्षा पोहचवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढत आहेत. एकनाथ शिंदे समर्थक ठाण्यात रस्त्यावर उतरले आहेत. आज महा विकास आघाडीचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबईहून आसाम मधील पंचतारांकित हॉटेलात ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे डेरा टाकून बसले आहेत त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीत एक मोठा भूकंप झाला.
आता शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष रित्या जनतेतून निवडून आलेले एकमेव मंत्री आहेत ते म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे. पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री शिवसेनेचे युवा नेते हिंदुृहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा शब्द शिवसेनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसे पाहिले तर आदित्य ठाकरे नेहमी नम्रपणे, शांतपणे बोलणारे नेतृत्व आहे. युवासेनेची टिम त्यांच्याजवळ असली तरी त्यांची भाषा, त्यांची देहबोली ही नेहमीच संयमी शांत व प्रेमळ अशी राहिली आहे. शिवसेनेमध्ये असलेले अनेक ज्येष्ठ नेते इतकेच काय तर विरोधी पक्षातील नेते सुद्धा आदित्य ठाकरे यांचा सन्मान करत आलेत शिवसेनेबरोबर राज्यातील पत्रकार सर्वसामान्य जनता यांना आदित्य बद्दल कमालीचा आदर आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेचे पूर्व रूप पाहता सत्ता असतानाही अत्यंत मवाळ पद्धतीने वागणारे आदित्य गेल्या दोन दिवसापासून आक्रमक झालेले दिसत आहेत. दिपक केसरकर या ज्येष्ठ आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्या या व्यक्त्वाचा समाचार घेतला आहे. खाजगी वाहिनीवर बोलत असताना आमदार केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भविष्याला शुभेच्छा देत असताना बोलताना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सेना भवनासमोर जमलेले शिवसैनिक म्हणतात तुम्हाला “जुनी शिवसेना” पाहिजे होती ना! ती बाळासाहेबांची शिवसेना तुम्हाला लवकरच रस्त्यावर दिसेल आणि खरोखरच शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना रस्त्यावर उतरते तर काय करू शकते? याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेला आहे महाराष्ट्रातील राजकारण आता विधानभवनातून रस्त्यावर आलेले आहे. रस्त्यावरून कदाचित ते कोर्टात जाईल राज्यातील राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्यावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येते राजकीय अस्थिरता निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेतेसाठी राष्ट्रपती राजवट लावण्यात येते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी म्हणजेच 2019 साली अल्पकाळ महाराष्ट्रा मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. त्यावेळची राजकीय परिस्थिती व आजच्या राजकीय परिस्थितीत फार मोठा फरक आहे. बंडखोर आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे यामुळेच राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे आसाम मध्ये असलेला बंडखोर आमदारांचा मुक्काम जून महिन्याच्या शेवटपर्यंत वाढवण्यात आला आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेना व एकनाथ शिंदे गटाचे नेते वेगवेगळ्या युक्त्या आखत आहेत. महाराष्ट्रात जरी कागदोपत्री सरकार असले तरी सर्वसामान्य जनहिताचे प्रश्न मात्र रेंगाळत आहेत. जनतेने निवडून दिलेल्या आमदाराने जनतेशी विश्वासघात केल्यामुळे भविष्य होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला राजकीय धक्का बसेल हे आता सांगणे कठीण आहे.