भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाचा
पहिला विजय.
विधानसभा अध्यक्षपदी राहूल नार्वेकर

भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाचा<br>पहिला विजय.<br>विधानसभा अध्यक्षपदी राहूल नार्वेकर

भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाचा
पहिला विजय.
विधानसभा अध्यक्षपदी राहूल नार्वेकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

विधानसभा अध्यक्षपदासाठी औपचारिकता आज पार पडली. विमान तळावर उतरल्यावर नवनिर्वाचित “शिवसेनेचे” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षीय पदाची निवडणूक व सभागृहात होणारी बहुमत चाचणी आम्ही सहज पार पाडू व विजयी होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. आमच्या कडे 170 आमदार आहेत व ते कुठेह जाणार नाही असे वक्तव्य केले होते. निडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजपने अपेक्षित बाजी मारली आहे.

नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.उच्च शिक्षित व तरुण अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या राहुल नार्वेकर यांचा विजय झाल्यावर सर्वच मान्यवरांनी सभागृहात त्यांचे अभिनंदन केले.

कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करून एकनाथ शिंदे समर्थक विधानभवनात दाखल झाले.या प्रसंगी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालेलं आहे. सर्व आमदारांनी सहकार्य केले. देशाने याची नोंद घेतली आहे की, महाविकास आघाडीचे मंत्री सत्ता सोडून बाहेर पडले. अनेकजण विरोधातून सत्तेत जातात. पण येथे सत्तळा असताना मंत्रीपदे असताना आम्ही बाहेर पडलो. बाळासाहेब आणि दिघेंचा मी सैनिक आहे. अनेकजण सांगत होते आमच्या संपर्कात 16-17 लोक आहेत.परंतु असे काही झाले नाही. मी म्हटलं मी त्यांना सन्मानाने परत पाठवेन. आमदार संपर्कात असल्याचा दावा करणारे एकही नाही सांगू शकले नाहीत.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिंदे गटातील 39 आमदारांनी शिवसेनेच्या प्रतोदांचा (सुनील प्रभू) व्हिप फेटाळल्याचं विधिमंडळाच्या कामकाजात नमूद केलं आहे.

तर यानंतर शिवसेनेचे नेते सुनील प्रभू म्हणाले, “या सदनात आमचा व्हिप झुगारून 39 आमदारांनी विरोधात मतदान केलं. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली हे महाराष्ट्राची 13 कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल.”
मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हातात घेतल्यावर आरे कॉलनी मध्ये मेट्रो शेडची उभारण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार विद्यमान सरकार करणार का? हे आता लवकरच लक्षात येईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *