हिंसेची उत्प्रेरक प्रसार माध्यमे
आपलं जगणं व्यक्तिगत असतं असं आपण सतत मानून चालतो पण आपल्या जगण्याला सार्वत्रिकता असते हे विसरता कामा नये ही सार्वत्रिकता हे नागरिकत्व आहे हे सुजाण वर्तन आहे हे हक्काचे अधिकाराचे कर्तव्य आहे वर्तन आहे या साक्षरतेपर्यंत आपण पोहोचणार आहोत अशी उद्दिष्टे आपण ठेवतो आणि ठेवली हि पाहिजेत
जीवन साक्षरता ही पैसा साक्षरता नाही पैसा साक्षरता हा जीवनातील स्थिरतेचा त्या आवश्यक असा विचार आहे पण पैसा साक्षरता हेच जीवन जेव्हा बनते तेव्हा आपले विचार वस्तूवादी धनवादी बनतात सभोवतालचे भौतिक व्यवस्था ही माणसाला बदलविते ती व्यवस्था आसक्ती माणसांच्या मना मध्ये भावना विकार प्रतिबिंबित करते एवढेच नाही तर विकार आणि लूट वृत्ती ही निर्माण करते म्हणून भौतिक व्यवस्थेच्या निर्माणाचे गतीचक्र हे विचार चक्राला उलटे फिरवते का? असा विचार करायला हवा विचार ही कृती असते असे अपवादात्मकच घडते
माणसांची कृती आगोदर असते आणि त्यातून विचार प्रतीत होतात म्हणून विचारापेक्षा कृती श्रेष्ठ नसते हा एक मानवी जीवनातील निकष सर्व दूर कधी पोहोचणार समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि घटकाच्या जीवनाला हा लागू कसा पडणार याचा विचार व्हायला हवा माणसांचा विचार म्हणजे माणसांची कृती माणसांचे हित म्हणजे विचाराचा स्वीकार होय माणसांचे सार्वत्रिक कल्याण म्हणजे विचार असे प्रबोधन चक्र होय माणसांच्या हितकारी जीवनाला हितकारी विचाराची नितांत गरज असते माणूस विचाराचा विचार करत नाही माणूस स्व सुखाच्या संयत वर्तनाचाही विचार करत नाही माणूस कृती करीत राहतो कृतीतून प्राप्त होणाऱ्या यशा अपयशाला आपले स्वतःचे यशस्वी विचार समजून जातो
माणसाचे हे जगणे कृतीने पुढे जाते ते जायलाच हवे पण माणसाची विचारशीलता ही गतिशील ता असते आघोरी जीवन संघर्ष ही पण एक यशाची स्वतः गृहीत धरलेली गतीशीलताच आहे आधुनिक उत्तर काळात गतीला अनन्य साधारण महत्त्व आहे क्षण आणि निर्णय पकडणे कृती आणि साध्य करणे या दिशेने प्रत्येक व्यक्तीने जनसमूह पुढे निघाला आहे काळ हा व्यक्तीला पुढे खेचत आहे हे खेचणे ह्या भौतिक व्यवस्थेच्या अदृश्य रेठ्याचा हा परिणाम आहे म्हणून गतिविकास धनविकास श्रम विकास व तंत्रज्ञान विकास व मानवी जीवनातील मौलिक मूल्य विकास यांचा एकसंघात सर्व काळात घातला जातोच असे नाही पण याची सम्यकता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे हे उद्दिष्टच मानव जातीच्या इहवादी जीवनाचे साध्य ठरू शकते
व्यक्तींच्या जीवनाला मो हा चे अनेक विषय नेहमी ग्रासत असतात यामध्ये दैनंदिन जीवनातील समस्या पेक्षा कृतक अशा णे निवेतील संघर्षाच्या प्रेरणा या जीवनाला प्रभावित करीत आहेत समाज या कृतक श्रद्धां यांचा बळी जात आहे जीवनाची वैयक्तिकता हे तुटले तुटलेले पण नसते वैयक्तिक जीवनाची विचारशीलता स्वतंत्रता व व्यक्तीचे सार्वभौम श्रेष्ठ मूल्य हे जीवनाचे आकलन समाजातील प्रत्येक घटकाला व्हायला हवे ते करून देण्याची गरज आहे तशी विचारशीलता घडवली पाहिजे अशी उद्दिष्टे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाने ठेवली तर माणूस निर्माण असे कार्य पुढे जाऊ शकते माणूस हे साधन आहे हे चाणाक्ष चाणक्याने ओळखले आहे माणूस व जातीसमूह सूड आणि संघर्षाच हत्यार म्हणून वापरता येते सतत द्वेष सतत सूड सतत बदला सतत अपमान या भावना चेतावल्या की समाज संघर्षामध्ये रूपांतरित करता येतो आणि शत खंडित समाज पाहिजे तसा नियंत्रित करता येतो त्याचे दमन करता येते त्याच्यावरील अत्याचार हे राष्ट्र आहेत असाही कांगावा करता येतो असे भारतीय वर्तमान आज निर्माण झाले आहे जगभरच हिसेची वादळे येत आहेत
हे सर्व विस्तृत समजून घेण्याचे कारण म्हणजे आपल्या कृतीला श्रेष्ठ ठरवणारा समाज विचाराला कमी लेखतो आहे
नस्वतःचे विचार तो सतत पायदळी तुडवत आहे इतरांच्या विचाराचा द्वेष करीत आहे तो विचार नाहीस करू पाहत आहे विचार करणाऱ्या व विचार शिकवणाऱ्या व विचारधाराचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा टोकाचा द्वेष सध्या चालू आहे त्या अशा त्या व्यक्तींना शत्रू ठरवणे हेच राजकीय यश मानले जात आहे दुसऱ्याचे विचार संपवणे त्यांचे अस्तित्व संपवणे त्यांचे सामाजिक जीवनातील स्थान संपवणे हे आपल्या स्वतःच्या कृतीचे यश अहंकाराने मानण्याचे दिवस सुरू झाले आहेत सर्व प्रकारचे गैरमार्ग ही माझी कृती मी करीत आहे ती रास्त आहे ते माझे श्रेष्ठत्व आहे ती माझी बुद्धी चातुर्य आहे चाणक्यगिरी आहे कपाटाला महत्त्व आहे फसवणुकीला ज्ञान मानले जाते हिसेला पराक्रम मानला जातो मानवी जीवनाचे विकार वर्तन हे विचार पराभवाचे समंज श शक्तीच्या अभावाचे कारण आहे
यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीचा पडताळा घेईल काय मी करत असलेली कृती ही विधायक आहे की विघातक आहे ती विध्वंसक आहे की कल्याणकारी आहे ती समाजविरोधी व राष्ट्रविरोधी आहे की सार्वत्रिक कल्याणाची आहे याचे भान व्यक्ती जीवनाच्या ज्ञानसाक्षरतेतूनच येऊ शकते तसे ते वाढवायला हवे. कृतीही विचाराची अविस्कृत गोष्ट असते विचाराची सुस्पष्टता विचाराची विधायकता विचाराची परिणाम फल श्रुती ही जेव्हा प्रत्येक व्यक्तीला अगोदर प्रतीत होते तेव्हा व्यक्तींची कृतीही हितकारी कल्याणकारी ठरू शकते ठरते म्हणून कृती श्रेष्ठ करायची असेल तर विचार श्रेष्ठ असायला हवे.
आज सर्व प्रकारच्या सत्ता उन्मदाचा कालखंड सुरू झाला आहे मुळात तो सर्व कालखंडामध्ये अनेक स्वरूपामध्ये तो सत्ता उन्माद होताच
भारताच्या धर्मास्मिताच्या संघर्षाचा हिंदुराष्ट्र निर्माणच्या सूड प्रवासाचा उन्माद हा अतिशय गुंतागुंतीचा आहे वरून तो एक राष्ट्र एक धर्म अशा घोषणा देत पुढे निघाला आहे या देशातली जर्जर अन्याय आणि अत्याचार
हे कायम आबादित राहावेत अशी धर्म जात मानसिकता तयार करणारा एक आधुनिक सनातन वाद भय वादाच्या स्वरूपामध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत या प्रयत्नामध्ये एकमेकाला संपवणाऱ्या जनजाती एकमेकाला संपवणारे राजकीय पक्ष त्यासाठी विचार संपवणारे शूद्र स्वार्थाचे राजकारण या देशाला संघर्षाच्या कड्यावरती नेऊन पोहोचवणार आहे आजचा भारत हा बहुविधता नाकारतो बहुसंस्कृतिकता नाकारतो अनामिकांचा इतिहास नाकारतो इतिहासाचा असत्य कथन वाद हाच श्रेष्ठ इतिहास आहे हे हिंसेचे भय दाखवून मान्य करायला भाग पाडतो आहे असा भारताचा सुवर्ण कालीन प्रवास पुन्हा निर्माण करण्याचे भासमान प्रयत्न माणसाला कळतील काय?
आपले सगळे जगणे हे गैर समजू तिच्या आधारे चालू आहे विचार म्हणजे समजूती नाहीत भारतीय जनमानसामध्ये पूर्वग्रहाच्या समजुती हेच आपले विचार आहेत असे गृहीत धरून बहुतांश समाज आज जगतो आहे गैर समजूती म्हणजे काय अपुरे ज्ञान खोटी माहिती खातरजमा करण्याचा अभाव न घेतलेला अनुभव या सर्वांनी मिळून समजूती बनतात गैर समजूतीमध्ये सत्य कमी असत्य जास्त असते समजूत ही विचारातून बनायला हवी समजुती मुळे विचारावर नितांत श्रद्धा असायला हवी वाढायला हवी विचार तपासून घ्यायला हवेत विचार चुकीचे असतील तर ते मी बदलतो इतकी विनम्रता प्रत्येक व्यक्तीच्या अंगी ज्ञानातून निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे .भारतातल्या असंख्य जनजातींच्या मध्ये जगण्याचे अथक प्रयत्न हे गैर समजुतीच्या पारंपारिक संस्काराच्या व प्रभुत्व जातीच्या अनुकरणातून हे पुढे चालू आहेत याचे दुष्परिणाम सार्वत्रिक समाजाला भोगावे लागत आहेत हे होऊ द्यायचे नसेल तर
विचार आणि समजूती यातील फरक प्रत्येक नागरिकाला करून द्यावा लागेल शिकवावा लागेलभावनेच्या आधारे गैर समजू ती वाढत जातात पूर्वग्रहाच्या आधारे गैर समजूतीवर अज्ञानाची आवरणे चढतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपली समजूत व गैर समजूत तपासून घ्यायला हवी आपली समजूत म्हणजेच आपले विचार नसतात समजूतीपेक्षा विचार ही एक सर्व मान्य अशी अनमोल गोष्ट असते बहुतांश वेळा समजूत ही व्यक्तिगत व प्रदूषित अशी गोष्ट असते व्यक्तीचा वर्तनवाद यातील फरक प्रत्येक व्यक्तीला करता आला पाहिजे हे शिक्षणातून शिकवायला हवे
वर्तनवाद हा विचार वाद असतो विचार हा सकारात्मक कृतीसाठीचा अनुकूल निर्णय असतो तो असायला हवा असे विचार वर्तन आणि कृती यांचे अन्य नाते प्रस्थापित करण्याचे भान भारतीय जनसमुहांना शिक्षणातून कधी आणि केव्हा? निर्माण होणार ते कोण? प्राप्त करून देणार हा एक फार मोठा समाज दुःखाचा वेदनेचा प्रश्न आहे
जातींचे शूद्रत्व व जातींचे श्रेष्ठत्व ही एक समजूत आहे हा कू संस्कार आहे धर्मस्मितांचे साठी जगणे हा इतिहासाचा वृथा अभिमान आहे त्यातील हे वर्तमानकालीन समजुतीचे पूर्वग्रहाचे सूडवादाचे पर्यावरण बदलले नाही तर आपली हिंसा कृती हीच श्रेष्ठ आहे असे समज समाजामध्ये रूढ होतील न्यायालय न्याय देते ते कायद्यांच्या सहिता आधारे पण न्यायालय हीच समाजाच्या शांती सदभावाच्या निर्माणाची अंतिम उपायाची कृती करू शकतात हे आता असंभव ठरत आहे न्यायपालिका ही श्रेष्ठ आहेच ती अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेक निर्णय यामध्ये झुकाव व पक्षपात करीत आहे पण निष्पक्ष व निस्पृह दिलेले निर्णय मान्य न करणारा भारतीय समाज हा नुपूर शर्माच्या निर्णयामुळे व्यतीत होतं आणि न्यायपालिकेला प्रश्नांकित करतो हे दुर्दैवी आहे कार्यपालिकेचे लोकप्रतिनिधी हे समाजाला हिसे साठी चिथावणी देतात आणि आणि वंचितांच्या न्यायाची सर्व दारे बंद के लि जातात हे भारतातील भयावह पर्यावरण आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पार दि वाला यांच्या वेदना या भारतीय समाज व्यवस्थेच्या विघटन पूर्व वेदना आहेत असे का मानू नये?
गैरसमजूतींच्या आधारे वर्तन करणारी प्रसारमाध्यमे हि अहा म गंडाने बेभान झालेली आहेत त्यातील मुद्रित माध्यमे ही जाती व्यवस्थेच्या उतरंडी नुसार सुड आणि शोषण या प्रकारे वर्तन करीत आहेत आणि प्रसार माध्यमे ही हिंसेची उत्प्रेरके ठरत आहेत म्हणून गैर समजूती या कधीच श्रेष्ठ नसतात विचाराच्या आधारे समजूती जेव्हा तयार होतात तेव्हा त्या समजुती विचाराहीपेक्षा श्रेष्ठ ठरण्याची शक्यता असते पण समकालातील विचार हा स्वीकाराच्या ऐवजी भूतकालीन विचाराच्या गैरसमजुतींच्या आधारे वर्तन करणारा समाज हा हिंसेची निमंत्रणे स्वतःसाठी तो देत आहे असा एक भयसूचक इशारा भारतीय वर्तमानमध्ये प्राप्त होत आहे म्हणून आपली कृती ही विचाराच्या आधारे असायलाच हवी विचार हे सत्यनिष्ठ कल्याणकारी असायलाच हवेत तरच कृती मधून विध्वंसकता निर्माण होणार नाही याची खात्री देता येते हिसा कृतीचे उन्म दाचे जय घोषाचे भारतीय वर्तमान हे बदलण्यासाठी गैरसमजुतीचा भारतीय जनमानसाचा प्रवास आपणाला बदलावा लागेल आणि सम्यक बंधू भावाचा बहुसंस्कृतिकतेच्या सम आदराचा वर्तमानाच्या सहजीवन प्रवासाचा नवा जीवनवाद निर्माण करावा लागेल इतिहास हासूड असतो इतिहास हा पराभवाचे शल्य असते इतिहास हे अज्ञानाचे प्रदेश असतात इतिहास हे अनामिकांचे नामशेष अवशेष असतात म्हणून विचाराची कृती हीच वर्तमानातील शांतीसदभावाची राष्ट्र निर्माणची श्रेष्ठ कृती ठरू शकते
जे कोणी बेभान समजू तिला श्रेष्ठ मानतात त्यांच्यासाठी
गैरसमजुतीची निरक्षरता त्यांनी नाहीशी करायला हवी ही एक हिंदुत्वाचा फासी वाद रोखण्यासाठीची सर्व जनजातींनी समजून घेण्याची अत्यावश्यक राष्ट्रीय गरज आहे असे मनोमन वाटते म्हणूनच कार्यपालिकेतील नेता बाबू लाला आणि झोला यांनी न्या यो चीत वर्तनाची ग्वाही द्यायला हवी सुधारणा करायला हवी हे वर्तन सुधारले तरच गैरसमजुतीची कृती रोखता येईल आणि विचाराची कृती हे भारत निर्माणच्यासाठी सतत उपयुक्त ठरेल
शिवाजी राऊत प्रेस सातारा
4 जुलै 22वेळ 8.10