“मुंबई तुंबली की तुंबवली”

“मुंबई तुंबली की तुंबवली”

मुंबई होणा-या जोरदार पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे यापुर्वीही मुंबईची तुंबई झाली होती तीच परिस्थीती आज ओढावली या प्रकरणावर दि. ०५.०७.२०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख नक्की वाचा.

“मुंबई तुंबली की तुंबवली”

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
“भट बोकड मोठा” या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

‘कच्चे मकान जितने थे बारिश में बह गए !
वर्ना जो मेरा दुख था वो दुख उम्र भर का था !’

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे त्यांच्या कवितेत मुंबई चे वर्णन करताना म्हणतात की, ‘मुंबई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |’. मात्र आज याच मुंबई ची तुंबई झाली ही खुप मोठी शोकांतिका आहे.
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज हा खरा होत नाही हे वेळोवेळी सर्वांनी अनुभवलं आहे. हवामान खात्याला पाऊस कधी किती होणार हे माहीत नसतानाही गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळाले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना ते म्हणाले की, ‘शिवसेना – भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणूनच दरवर्षी मुंबई पाण्यात जाते’ हे विधान सत्य असू ही शकते यात कोणतीच शंका येत नाही.
त्यापुढेही जितेंद्र आव्हाड महापालिकेच्या कामावर जोरादार टीका करताना म्हणाले की, ‘नालेसफाईच्या कामाचं आधी टेंडर काढून हे काम मे महिन्यापर्यंत संपणं अपेक्षित असते. पण हे काम मे महिन्याच्या अखेरीस सुरू केलं जातं आणि जूनच्या सुरुवातीला अर्धवटच संपवलं जातं. त्यामुळे काम अर्धवट रहीले जाते. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, ‘खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करून घेतली असती तर आज मुंबईवर पावसामुळे बुडून जाण्याची वेळ ओढवली नसती’ हे अशोक चव्हाणांचे म्हणणे नक्की योग्य आणि सत्य आहे.
पाऊस पडावा म्हणून मराठवाड्यात लोक देव पाण्यात ठेवतात मात्र मुंबई महापालिकेने तर चक्क मुंबईच पाण्यात ठेवली आहे. रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने सोमवारी मुंबईकरांची दाणादाण उडाली, तरी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मात्र मान्य करत नाहीत. ते अजब दावा करताना म्हणतात की, मुंबई कुठेच तुंबली नाही, तुम्ही विनाकारण प्रश्न निर्माण करत आहात, मुंबईत सारे काही व्यवस्थित सुरू आहे. कुठेही पाणी तुंबलेले नाही, किंवा वाहतूक कोंडीही झालेली नाही. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले नाही. मुसळधार पावसामुळे काही परिसरात सखल भागात व सब-वे असलेल्या ठिकाणी पाणी साचले होते. मात्र त्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपाद्वारे काही वेळातच पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच काही ठिकाणी गाड्या सिग्नल लागल्याने उभ्या होत्या, त्याला वाहतूक कोंडी म्हणता येणार नाही. मी स्वत: सांताक्रुझहून भायखळ्यापर्यंत गाडीने आलो तसेच मुंबईचा महापौर म्हणून मी सर्व ठिकाणी फिरलो, मात्र मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. वाहतूक कोंडी नेहमीचीच
तुम्ही मला पाणी कुठे तुंबले हे दाखवा, मी त्या ठिकाणी तुमच्यासोबत प्रशासनाला घेऊन येतो. असेही महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर मग मुंबई पाण्याने तुंबली हा सर्व महाराष्ट्र पाहतोय परंतू महापौरांना ती तुंबलेली मुंबई दिसत नसले तर त्यांना मोतीबिंदु शस्त्रक्रियेची नितांत गरज आहे असेच म्हणावे लागेल. महापौरांनी केलेले वक्तव्य म्हणजे ‘खोटे बोल पण रेटुनं बोल’ असेच म्हणावे लागेल.
मुबंई तुंबण्याचे कारण मँहणजे कचरा किंवा प्लास्टिक अडकल्याने मुंबईत पाणी साठते, तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली नसून फांद्या पडल्या आहेत, असा दावा महापौरांनी केला होता. तर मग प्रश्न पडतो की महाराष्ट्र शासनाने केलेली प्लाटीक बंदी फेल गेली की काय ? याच भाजप शिवसेना सरकारने प्लाटीक वापरण्यास बंदीच्या नावाखाली प्रशासनाच्या माध्यमातुन सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवली होती. तर मग मुंबई प्लाटीक मुळे तुंबली कशी ?, नुसत्या झाडांच्या फांद्या पडल्याने मुंबई तुबते कशी ? असे प्रश्न निर्माण होतात.
मुंबई ची तुंबई झाल्यानंतर अशोक चव्हाण म्हणतात की,
शिवसेनेची मुंबई महापालिकेत सलग दोन दशके सत्ता असतानाही जनतेला मुलभूत सोयी-सुविधा देण्यात शिवसेना साफ अपयशी होताना दिसतेय. तसेच विकास तर दूरच पण नियोजनशून्य कारभार आणि अनिर्बंध भ्रष्टाचारामुळे मुंबई अधोगतीच्या गाळात बुडते आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची लूटमार सुरू असताना स्वयंघोषित ‘पहारेकरी’ ही झोपेचे सोंग घेऊन निवांत बसला आहे.
युवा सेनेचे अध्यक्ष हे मराठवाच्या दुष्काळी दौ-यावर असताना त्यांना कापुस सुकलाय की वाळलाय हेच समजत नव्हते मात्र ते तुंबलेल्या मुंबई बद्दल म्हणतात की, तुंबलेली मुंबई ही नैसर्गिक स्थिती, उगीचचं पालिकेला दोष देऊन नका.
कॅगच्या अहवालातून अशी धक्कादायक बाब समोर येत आहे ती म्हणजे प्रतितास २५ मिमी इतक्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईतील गटारांची क्षमता आहे. मात्र, ही गटारे गाळाने भरलेली असल्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहून नेऊ शकत नाहीत. तसेच हा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला होता. यातून मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत. तर मग महापालिकेचा नियोजनशुन्य कार्यभार आणि कामात भ्रष्टाचार व दिरंगाई करणारे अधिकारी यांचा विचार केल्यास तसेच तुंबलेल्या मुंबईची आजची परिस्थिती पाहता आण्णाभाऊ साठे यांच्या कवितेतील शब्द म्हत्वाचे ठरतात.
‘पैदास इथे भलतीच चोरांची |
एतखाऊची | शिर्जोरांची |
हरामखोरांची | भांडवलदाराची |’.
शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणतात की, हिंदूवर हल्ले होत असतांना आम्ही शांत बसणार नाही, आमच्या हातात बांगड्या नाहीत. खैरे साहेबांना जर खरच ऐवढी चिंता हिंदुची असेल तर मग प्रश्न पडतो की, तुंबलेल्या मुंबईत हिंदु राहत नाहीत का ? की तेथे डुबून मरणारे हिंदू नाहीत का ?.
मुख्यमंत्री व शिवसेनाध्यक्ष म्हणत होते की, ‘आमचं ठरलय’ तेव्हा वाटते मुंबई ची तुंबई करायचे ही ठरवले होते का ? एक मात्र शिवसेनेच्या दृष्टीकोणातून चांगल झालं ते म्हणजे तुंबलेल्या मुंबईत पाण्यावर धावणाऱ्या ट्रेन ची यशस्वी चाचणी करण्याचं यश मिळले.
शिवसेनाप्रमुखांनी लोकांना आयोध्येत घेऊन जाण्याऐवजी मुंबईत जर लक्ष दिले असते तर आमची मुंबई ही तुंबई झालीच नसती. तसेच देवदर्शनाऐवजी नालेसफाई केली असती तर मुंबई बुडाली नसती. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
एक मात्र आहे की, आज माहीतीचा अधिकाराविना महापालिकेने नेमके कोणते कार्य केले ते समजत आहे. ‘पावसाळा आला की कळते, कुणाचे बांधकाम किती मजबूत आहे, अन् नाल्याची सफाई झाली की नाही हे पण सत्य होते. पंरतू महापौरांना जरी तुंबलेली मुंबई दिसत नसली तरी जनतेला मात्र ‘मुंबई तुबंली की तुंबवली’ हे समजतं आणि दिसतही आहे.

टिप – सदरील लेख यापुर्वीच म्हणजे दि. ०५.०७.२०१९ रोजी नामांकित दैनिकांमध्ये प्रकाशित झालेला आहे.

दि. ०५.०७.२०१९ – दै. युवा छत्रपती
दि. ०५.०७.२०१९ – दै. कुलस्वामीनी संदेश, लातूर
दि. ०६.०७.२०१९ – दै. सम्राट (संपुर्ण महाराष्ट्र)
दि. ०६.०७.२०१९ – दै. बालाघाटचा आवाज, लातूर
दि. ०६.०७.२०१९ – दै. रिपब्लिकन गार्ड, नांदेड
दि. ०७.०७.२०१९ – दै. लोकप्रधान, सोलपूर
दि. ०५.०७.२०१९ – दै. कार्यारंभ, बीड

नवनाथ रेपे लिखित “भट बोकड मोठा” हे पुस्तक पोस्टाने घरपोहोच मिळेल.
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२

रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *