– डॉ. श्रीधर सांवत विद्यामंदिरच्या पालक सभेत शैक्षणिक पूरक उपक्रमात पालकांनी हि सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर – सध्या सुरु झालेल्या शैक्षणिक वर्षामध्ये जय भारत शिक्षण संस्था अंतर्गत पहिली ते सातवी व आठवी ते दहावी या वर्गाची शाळेच्या सभागृहात खेळीमेळीत संपन्न झाली .या वेळी डॉ. श्रीधर सांवत विघामंदिर आणि जयभारत हायस्कूल च्या विधार्थी वर्गाचे पालक सहभागी झाले होते .
पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेल्या .या सभेच्या प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्षा सुमित्रा जाधव मॅडम यांनी आपल्या मनोगतात शाळेमध्ये आपल्या पाल्यांची 100 टक्के उपस्थिती ,शालेय वैशिष्टपूर्ण उपक्रम, शिस्त,नियमित उपस्थिती ,नियमित अभ्यास,शिष्यवृत्ती परीक्षा, सेतू अभ्यास चाचणी याबद्दल चर्चा समग्र करत आगामी काळात शैक्षणिक पूरक उपक्रमात पालकांनी हि सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्था सदस्य व जय भारत हायस्कूल मुख्या.अश्विनी चंद्रकांत पाटील यांनी माता पालक,शिक्षक पालक,शाळा व्यवस्थापण समिती तसेच महिला दक्षता समिती बद्दल माहिती सांगून समित्या स्थापन करून घेतल्या.तसेच
1 ली ते 10 वीच्या पालकांनी वर्गावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन पाल्याना लाभत असलेचे समाधान व्यक्त केले.
यावेळी पालकांनी ही आपली मते मांडली यामध्ये पालक रेणुका साळुंखे यांनी “शालेय वातावरण छान आहे.चांगले उपक्रम राबविले जातात. शालेय शिक्षण सोबत मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडवला जातो.या शाळेत प्रवेश घेतला आम्हाला अभिमान आहे” असे मत नमूद केले. तर ” समर्पित संस्था , शिक्षक व कल्पित विचाराचे उपक्रम जाधव मॅडम राबवितात त्यामध्ये आम्हा पालकांचा सहभाग घेतला जातो . त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यासह रुपाली संन्नकी ” माझी मुले याच शाळेत जाणार असा हट्ट करत होती, इमारत सुव्यवस्थित असल्याचे दिसून येते. आता मुले आपल्पाच शाळेत परत येण्यास खूप उत्सुक होती . आज ती शाळेत येवून खूप खूश आहेत”अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या समारोप मनोगत व्यक्त करताना सौ सोनाली देवकुळे “वाचन लेखन गणित पक्के करून घेणे याकडे विशेष लक्ष दिले जाते शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याने या संस्थेचे 1ली ते 10वी विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याची जबाबदारी आमची असे वक्तव्य टाळ्यांच्या गजरात केले.
यांच्यासह उदय पाटील ,सुरज सर्जेराव , पद्मिनी नायर , सौ . वर्षा शिरसाटे , यांनी मनोगते व्यक्त केली .विशेष म्हणजे विध्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची चव घेत समाधान व्यक्त केले . आगामी काळात होत असलेल्या आरोग्य शिबीर – पर्यावरण सहली – सार्वजनिक ग्रंथालये – औद्योगिक संस्था भेटी या उपक्रमात ही सहभागी होण्या चा निर्धार यावेळी पालकानी व्यक्त केला .
Posted inकोल्हापूर
डॉ. श्रीधर सांवत विद्यामंदिरच्या पालक सभेत शैक्षणिक पूरक उपक्रमात पालकांनी हि सहभागी होण्याचे आवाहन
