‘काळ्या टोपीची काळी करामत’
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com
सांगोला मतदार संघाचे आमदार काय ती झाडी, काय तो डोंगार आणि काय ते हाटेल म्हणाले पण काल जो मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रालयात सत्यनारायणाचा थाट मांडून मनुवाद्यांचा घाट बांधला तेव्हा म्हणाव वाटत की, एकीकडे काय तो सत्यनारायण, काय ते मुख्यमंत्री, काय त्या खारका, खोबर !अन् दुसरीकडे पुजा बघून शांत बसणार कुठे गेल ते डंग्र ! कारण मंत्रालयात सत्यनारणाची पुजा थाटली जात असताना राज्यपाल महोदयांनी काय अँक्शन घेतली ?हे राज्यपाल आहेत की, भाजपाचे शाखाप्रमुख ?अशा प्रकारच्या प्रतिक्रीया महाराष्ट्रातील मतदारांकडून पहायला मिळत आहेत. त्या चुकीच्या म्हणताच येणार नाहीत कारण राज्यपाल कोश्यारी हे संघ धार्जिण्या भुमिका घेत आहेत हे वास्तव आहे. म्हणून तर त्यांना अनेक वेळा नेत्यांच्या आणि जनतेच्या रोषाला सामोर जाव लागल आहे.
‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात ‘भाजपाल”, आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलं. (एबीपी माझा ४ मार्च २०२२) हे एकदम बरोबर आहे कारण शासकीय व निमशासकीय कार्यालयात कोणत्याही धर्माचे स्तोम माजवू नये असा अध्यादेश असताना मात्र हे सावरकर धार्जिणे मुख्यमंत्री तिथे पुजेचा थाट मांडतात आणि त्यावर काळ्या टोपीतले शिपाई काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा त्यांच्या बुध्दीची किव येते. यावेळी आठवतात ते यशोमती ठाकूर यांचे शब्द कारण त्या म्हणतात की, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे. राज्य सरकारचे जे मूलभूत अधिकार असतात त्या निर्णयातही सध्या बाधा आणली जात आहे. ज्या संविधानाने देश एकत्र जोडला गेला आहे त्यावरच प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला प्रश्न विचारणारी व्यक्ती संविधानाचे पालन करते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (दै. दिव्य मराठी) हो ठाकूर यांचे शब्द आज तरी राज्यपाल महोदयांना लागू पडतात कारण त्यांची भुमिका व विचार हे काळ्या टोपीतून निघालेली घाण ? आहे. इतर वेळी राज्यपाल आक्रमक होतात मात्र भाजपच्या काही केले तर मात्र ते थंड दिसतात म्हणून तर दै. सामनाचे संपादक म्हणतात की, राज्यपाल कोश्यारी मंद गतीचे झालेत; राजभवनात एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल’(सामना अग्रलेख लोकशाही २४ मे २०२२)
राज्यात महाविकास आघाडीचा जन्म होताच अनेकांच्या मांडीच्या सांधीत जळजळ होऊ लागली होती, त्यात आघाडीवर होते ते रेशिमबागेतील किडे. ह्या किड्यांची वारंवार होणारी वळवळ व राज्यपाल महोदयांची भाजपसाठी होणारी तळमळ ही वेळोवेळी दिसत होती. या किड्यांनी महाविकास आघाडीतील काहींना इडी बीडी ची धमकी दाखवत तर काहींना वाँशिंग करून स्वतःकडे आकर्षीत करून घेतले. त्यामुळे मविआ सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे व भाजप यांच्या गटाच्या युतीचं सरकार आलं. हे सरकार स्थापन झालं असलं तरी पक्षांतर व अन्य अनेक मुद्द्यावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याच अनुषंगानं विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात इतका होपलेस आणि बोगस राज्यपाल झालेला नाही. मी हे जाहीरपणे सांगतो. आतापर्यंत राज्यात अनेक राज्यपाल होऊन गेले. पण त्यांनी धर्म, जात, पंथ किंवा पक्ष असा भेदभाव केला नाही. हे सगळे राज्यपाल सर्वांना समान न्याय देणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात काम करणारा माणूस कसा असला पाहिजे. तो व्यापक दृष्टिकोन असलेला हवा. ठराविक पक्षाचं धोरण राबवणं हे राज्यपालांना शोभत नाही. आताच्या राज्यपालांनी मिनी मंत्रालय सुरू केलं हे अत्यंत अयोग्य आहे. (हिंदू. टाईम्स ०४ जूलै २०२२).म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘खाल्लेले पंचगव्य
हगणवटीत अडकले
मग इडी च्या भितीने
डोगार-झाडीत भडकले !’.
कोश्यारी म्हणजे स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला मिळालेल सर्वात बोगस राज्यपाल असून फार विचित्र माणूस आहे. हे कुठून आले, कसे आले, कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती. जेवढे काही महाराष्ट्राला राज्यपाल लाभले आहेत, त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेलं बरं अस मत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल व्यक्त केल. (लोकसत्ता ४ जूलै २०२२) हो भुयार बोलले ते योग्य आहे कारण यापुर्वी कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूपदावर संशय घेऊन महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांची खिल्ली उडवून षंढपणाच प्रदर्शन घडवल होत. त्यावर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. त्यात भाजपचे उदयनराजे भोसले म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे. तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यानीही कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत म्हटल की, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीचा कुठलाही पुरावा नाही. असा निर्णय यापुर्वीच औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. (टाईम्स् मराठी २८ फेब्रु. २०२२) तर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यपालांनी महाराष्ट्राचा विश्वास गमावलेला आहे. राष्ट्रपती महोदयांनी याची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. राज्यपालांचं वर्तन घटनात्मक पेचप्रसंगाकडे जाताना दिसतयं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुघल-इंग्रज, पोर्तुगीजांना पुसता आला नाही. संघी काय चीज आहे. (सकाळ २८ फेब्रु २०२२) नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान करणं दुर्दैवी आहे., हेमंत ढोमे म्हणाले की, आपल्याला ज्यातलं काहीच कळत नाही, त्यावर का बोलावं ? हे थेट अज्ञान आहे .तसेच सत्यजित तांबे म्हणाले की, राज्यपाल पदाची गरिमा घालून टाकली या व्यक्तीने.’ (मुंबई तक २८ फेब्रु २०२२) तर नको तिथे बोटे घालण्याची सवय कोश्यारींना आहे अस राज ठाकरे म्हणाले होते. म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘आरएसएसची राखून पायरी
फुल्यांवरती करतात शायरी
टोपी काळी करामत काळी
असा आमचा भगू लेकुळी !’.
समाजात जातीय तेढ निर्माण करणा-या कंगणा रणावत यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगतसिंग कोश्यारी हे समाजकारण कमी आणि राजकारण जास्त करतात, हे वेळोवेळी दिसल आहे. त्याविषयी शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात की, राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येत आहे. समझनेवालों को इशारा काफी हैं ! (१९ एप्रिल २०२०) कारण कधी कंगणाची भेट तर कधी फडणवीसांच्या ओठात पेढ्यांसाठी बोट घालताना कोश्यारी दिसतात. काल परवा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पेढा खाऊ घालताना राज्यपाल महोदयांचा व्हिडिओ व्हायरल झाल्या त्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ‘मी अनेक शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो. मात्र, मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही.’ (लोकसत्ता ४ जूलै २०२२) म्हणून इथे स्पष्ट होत की, कोश्यारी हे राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत ?कोश्यारींनी यापुर्वी नेहरूवर चिखलफेक केली होती तेव्हा नाना पटोले म्हणाले की, नेहरू यांच्यावर टीका करणे राज्यपाल कोश्यारी यांना शोभत नाही. त्यांनी भाजपचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांना स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं. राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार राज्यपालांना नाही. (लोकसत्ता ०१ आँगस्ट २०२१) तसेच एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यावर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, राज्यपाल हे भाजपचा कार्यकर्ता म्हणून जास्त काम करत आहेत. (मा. महानगर ०३ मार्च २०२२).
काळ्या टोपीतील काळ्या विचाराने चुकीचे वक्तव्य करून इतर समाजाची, महापुरुषाची किंवा संविधानिक मुल्यांची पायमल्ली केली तर संघ धार्जिणे राजकारणी सारवासारव करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस ते म्हणतात की, जाणिवपूर्वक स्वत: असंवैधानिक कृती करायची आणि मग राज्यपालांवर टीका करायची, त्यांना अपमानित करायचे, टार्गेट करायचे आणि तसा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार अयोग्य आहे. (महाराष्ट्र देशा २५ मार्च २०२२) राज्यपाल महोदयांना वैयक्तीक टार्गेट करणा-या लोकांचा काय कोश्यारींच्या बांधाला बांध का घराशेजारी घर आहे ?राज्यपाल महोदयांनी संविधानिक पदावर बसून संघ धार्जिण्या भुमिका घेण योग्य आहे का ?त्यांना जर संघाचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन रेशिमबागेत बसून राजकारणावर काय आभाळ हेपलायच आहे ते खुशाल हेपलाव त्याचा बहुजन समाजाशी काडीमात्र संबंध नाही. पण राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून संविधान विरोधी वक्तव्य कधीच खपवून घेतले जाणार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात सत्यनारायण पुजा करून अकलेचे देव्हारे माजवले त्यावर कोश्यारीनी एक शब्द ही न बोलणे हे कोश्यारींच वर्तन संविधानिक आहे का ?तेव्हा सांगावं वाटत की, ज्यांच पित्त भारतीय राज्यघटनेमुळे खवळत त्यांच्या हाती सत्तेची सुत्रे जात असून हे धोक्याच आहे. म्हणून तर संघ भाजप समर्थक असणारे कोश्यारी यांच्याबात शिवसेनेने आपल्या सामना मध्ये म्हटले की, राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये, हे भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलं. कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजप नेते असतील. पण सध्या ते राज्याचे राज्यपाल आहेत, याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडल्याचं दिसत आहे. भाजपचं पोट दुखतंय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीला बाळंतकळा याव्यात हे गंभीर आहे. (बीसीसी मराठी १५ आक्टों. २०२०) त्यामुळे असे संविधानिक पदावर बसून असंविधानिक काम करणारे काळ्या टोपीतले काळ्या विचारांचे शिपाई ओळखून यांचा बदोबस्त करा अन्यथा तुमचा व बहुजन महापूरुषांच्या विचारधारेचा डोळ्यादेखत खुन होणार हे नक्की. म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘ज्याच्या सत्यनारायण उशाला
तो बायको भोगतो कशाला
बिनासायास हलेल पाळणा
तू खेळव मांडीवर बाळांना !’
नवनाथ रेपे लिखित ‘भट बोकड मोठा’ हे पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
- rukmaipub@gmail.com