जपा आणि जप
(शोध)
अधिष्ठान आणि नेनिव यांची चर्चा होत नाही याचे कारण काय? अधिष्ठान म्हणजे काय? नेणीवम्हणजे काय?
हे समजावून घेतले पाहिजे तरच अधिष्ठानाच्या अधीर मानसिकतेने धां स्तावलेला या देशातील प्रत्येक नागरिक हा अधिष्ठान ग्रस्त जो झाला आहे तो बद लविता येईल.अधिष्ठान म्हणजे अपघाती जन्मप्राप्त व्यवस्थेतील जातीय व वर्णीय स्थान होय अधिष्ठान म्हणजे त्या वर्ण व जातीमधील भलेभुरे स्थान आणि ती जाती अंतर्गत स्व त गृहीत धरलेली प्रतिष्ठा होय आणि त्यातून प्राप्त होणारा छद्मी आनंद होय.
अधिष्ठान ही अभिजन वाद्यांनी तयार केलेली नेणीवआहे
कुळ जाती वर्ण अवघेचि गा अकारण. असा निव्वळ राग संत चलवलितू न व्यक्त जाहला आहे तो व्यक्त होत राहतो असा उपदेश इथेच वारंवार झाला तरीही अधिष्ठान आणि नेणीव यांनी बदल करू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पछाडलेले आहे अपघाती प्राप्त जाती व वर्ण व्यवस्थेत जगु पाहणारा बहुतांश समाज हा वर्ण व जाती आत्रंगत दुहेरी प्रतिष्ठिने आयुष्यभर जगतो परंतु त्याला ते चूक हि वाटत नाही त्या वर्ण व जाती अंतर्गत अधिष्ठानाला आपले वर्ण अंतरंगात किती मामुलीकरणाची किंमत आहे? हे शेवटपर्यंत त्याला प्रतीत होत नाही त्यामुळे तो तसे वर्तन करण्याला स्वधर्म म्हणतो आणि सुख नेव जगू पाहतो त्याला ती चूक वाटत नाही व्यवस्थेने तयार केलेल्या अधिष्ठान आणि नेणीव या सापळ्यात प्रत्येकाला अडकवणारी अदृश्य ऑक्टोपसी अवस्था यात्त ना कायम इथे कार्यरत आहेत त्यामुळे नेनिव जपा अधिष्ठान जपा व यातूनच आपले सर्वांचे भले आहे आपण भले बुरे परिवर्तन करीत आहोत हे अर्ध्य सत्य आहे असा तो उदार व प्रागतिक दृष्टिकोन बाळगून विचाराणे व निष्ठेने भिन्न चलवलीत समर्पित आयुष्य जगणारे असंख्य परिवर्तनवादी सभोवताली आहेत या परिवर्तन वाद्यांच्या विचारनिष्ठा वर्गीय रुपांतरीत आंदोलन काळात होतात त्या तयार होतात पण परिवर्तन वाद्यांच्या वर्णीय व जातीय निष्ठा या त्यांना अंतर्गत मानसिक पातळीवर सतत कुर तडत असतात ते त्या अंतर्गत जात व वर्णांमध्ये त्यांचे प्रतिष्ठेचे स्थान अबाधित कसे राहील हे पहात राहतात तसे प्रयत्न करतात तसे वर्तन करतात त्यामुळे बदल करू पाहणारा सोबतचा प्रत्येक परिवर्तनवादी हा संशयाने घेतला जातो संशय ही व्यक्ती दोषाची बाब आहे विचार प्रक्रियेच्या अवस्थेतील अपूर्णता आहे पण संशय हे सामाजिक पर्यावरणाचे फलित वर्तन असते हे सुद्धा नाकारता येत नाही दीर्घकालच्या फसवणूक अविश्वास या वातावरणातून संशय हा वाढू लागतो आणि सोबत असणाऱ्या अनेक साथीदार प्रत्येकाच्या वर्तनाबद्दल साशंकता घेतात संशय व्यक्त करतात त्यातूनच बांधिलकीच्या निष्ठेचे बंध तुटतात आणि कप्पेबंद वर्तनाचे समाज जीवन सुरू राहते आचरणाची तफावत ठेवली तरी चालते व्यासपीठावरील कथन चळवळीतील वर्तन घरातील व जाती व वर्णातील वर्तन हे भिन्न भिन्न असले तरी चालते असा दुटप्पी वर्तन व्यवहार हे अधिष्ठान आणि नेणीव जपण्याच्या छुप्या प्रयत्नातून होते
बदल करू पाहणारा समाज हा निष्ठा तपासतो बांधील की जपणाऱ्या मात्र प्राकृतिक व्यक्ती आणि संघटनां ना
आक्षेपाला सामोरे जावे लागते सतत संशय आणि कैद केले जाते अविश्वास दाखवला जातो प्रत्यक्ष कृतीतील निष्ठा न तपासता जात व वर्णीय निष्ठांचे उने दूणे काढले जाते
यातूनच जोपर्यंत अधिष्ठान आहे तोपर्यंत जात आहे जोपर्यंत अधिष्ठानाची शूद्र मानसिकतेचीनेणीव अस्तित्वात आहेतोपर्यंत जात आहे हे जाती निर्मूलनातील दुष्टचक्र निरंतर भारत वर्षामध्ये फिरत आहे यामध्ये कळवण्याच्या बांधिलकीच्या सुधारकांना सुद्धा करण्यात आले आहे व्यवस्थेचे दृष्टि पण मांडणारे तत्त्वचिंतक सुद्धा यामधून सुटलेले नाहीत करते सुधारक सुद्धा त्यांना बंदिस्त करण्यात आले आहे त्यामुळे अधिष्ठान आणि नेणीव याचाबुद्यितील केमिकल लोच्या आहे असे
सतत सांगितला पाहिजे तसे कथन केले पाहिजे त्याचे दोष आणि परिणाम याची चर्चा झाली पाहिजे अधिष्ठानाच्या कृतक मानसिकतेमध्ये वर्ण जातीचा प्रथा अभिमान असतो अधिष्ठान ही इथे आपसूक गोष्ट आहे ती कवटाळून बसण्यात अर्थ नाही व्यक्ती जीवनातील कर्तुत्वातून ज्ञान आणि निष्ठेच्या बांधिलकीतून अधिष्ठान प्रस्थापित करता येते हा आत्मविश्वास या समाजाच्या अंगी नाही आपसूक योगायोगी व अपघाती प्राप्त झालेल्या अधिष्ठान हे मला समाधान देते मोठे ठरवते म्हणून मी अधिष्ठानाचा सतत विचार करतो मी ज्या जात आणि वर्णाचा घटक आहे त्याचे समर्थन करीत राहतं त्यात सहभागी होतो त्याच्या वर्तनाच्या आत्मचिकिसा व परिशीलन मी स्वतः करत नाही मी मूग गिळून गप्प बसतो आणि छुपा वर्ण व जातीय अभिमान हे माझ्या अधिष्ठानाचे प्रेमाचे गमक बनते हे मला आयुष्यभर कळत नाही असाच व्यक्तीचा अधिष्ठानाचा दुभंगलेला वर्तन प्रकार चालू असतो आणि यामध्येच ती प्रभुत्व जातीचे व कृपया कुटील षड्यंत्राचे सांस्कृतिक राजकारण करत राहते चळवळीतील बदल तत्त्वज्ञानाची मांडणी सुधारक विचारांचा प्रचार हे चालत राहील पण कुटुंब आणि समाज पातळीवरील आपला अलिप्त दुठप्पीपणा हाही हरकत नाही असे समर्थनाचे प्रयत्न सतत सभोवताली दिसून येतात संशय अविश्वास याच्या आधारे जगू पाहणारा समाज विघटनाकडेच जाणार अधिष्ठानाच्या हव्यासाने पछाडलेला समाज हा एकात्म होणार नाही वर्ण व जाती गटाचे अधिष्ठान आणि मानव्याचे अधिष्ठान संविधान प्राप्त अधिकाराचे अधिष्ठान याची साक्षरता वाढवावी लागेल हे जोपर्यंत शिक्षणातून प्रबोधित केले जात नाही तोपर्यंत अधिष्ठानाचे बळी हे भारतीय प्रबोधनाचे अडसर कायम ठरणार आहेत म्हणून अधिष्ठानाचे नायक हे नाही रे वर्गाचे नायक म्हणून नाकारले जातात हे इथे सर्व चळवळींच्या मध्ये नेतृत्व वादावरूनअनेक वेळा घडलेले आहे. असे अनेक अधिष्ठानाचे बळी गेलेले नेते आहेत ते नेणीवग्रस्त असंख्य नेते आहेत महाराष्ट्र देशी तयार झालेल्या अनेक चळवळी उदा पॅंथर यु क्राद b समता आंदोलन विषमता निर्मूलन श्रमिक मुक्ती दल यासारख्या अनेक चळवळींच्या मध्ये नेतृत्वाच्या पासून दूर गेलेले असंख्य कार्यकर्ते हे अधिष्ठान वनेणीव ग्रस्त नेतृत्व यांच्या मानसिकतेचे शिकार झालेले होते आणि आहेत हे कुणी मान्य करीत नाही दलित चळवळ नामांतर चळवळ भूमिहीनांची चळवळ आदिवासी चळवळी विद्रोही संस्कृती चळवळ या असंंसदीय चळवळी यांच्याबरोबर संसदीय राजकारण करणाऱ्या पक्षीय राजकारणामध्ये सुद्धा अधिष्ठान आणि नेणीव यांच्या यांच्या विपरीत परिणामाचे फलित दैनंदिन राजकारणात व समाजकारणात पाहावयास मिळते प्रभुत्व जातींची अधिष्ठान ग्रस्तता ही निम्न जातींच्या आधिर शरण अनुकरणवादी मानसिकतेचे वर्तन करीत असतात त्यामुळे सर्वत्र विघटन हे वेगाने होत आहे चळवळी फुटणे ही विचार भिन्नता व बांधिलकीची सिद्धता असते असे सांगितले जाते पण व्यापक अर्थाने विचार केल्यास त्याच्या समाज बदलाच्या किमान उद्दिष्टांचे एकमत असल्यामुळे त्या परिवर्तनाचे लद्यातील ते एकमेकांशी सहसाथी दार म्हणून हि ते एकमेकांशी बंधुभाव बाळगून वर्तन करीत राहतात
हिंदुत्व आणि अधिष्ठान हिंदुत्व आणि ने निव हे वेगळे काही नसते मुळात प्रत्येक व्यक्तीचं काहीच नसणे असे असते परंतु अपघाती व्यवस्थेने वर्ण व जातीमध्ये ठोकून बसवलेले आपण असणे हे सनातन हिंदुत्व फॅक्टरीचे निरंतर उत्पादन चालू असन असते तसे ते इथे आहे त्यामधील धन्यतावादी अधिष्ठानवादी नेनिववादी असंख्य जनजाती या भयाने जगत राहतात यामध्ये असुरक्षितता खूप असते बहिष्कृत तेचे त्यांना ग्रास त असते अधिष्ठान जाईल स्थान नष्ट होईल हे ते भय असते जन व्यवहारातील इतरांच्या कडून मिळणारा ग्रहीत नकार असतो आणि त्यातूनच अधिष्ठान आणि हिंदुत्व ने निव आणि हिंदुत्व
ही भारतीयांच्या जगण्याची अदृश्य बुद्धीच्या दुर्गतीच्या अवस्थेची नियंत्रण कारणे असतात ती विपरीत परिणाम घडवितात जो समाज वर्तमानाचा विचार करीत नाही दुःख आणि समस्यांच्या कारणाचा शोध घेण्याची इच्छा इच्छा बाळगत नाही तसा प्रयत्न करीत नाही कोणता हि न्यायासाठी चालवलेला संघर्ष हा विधायक असतो यावर विश्वास नाही हे इथे वास्तव आहे भय भय म्हणजे तरी काय? मृत्यू पलीकडे दुसरे काहीच असत नाही तरीही भय बाळगणारा भारतीय समाज हा तयार केलेला भय व न्यूनगंडग्रस्तसमाज आहे त्यांच्या अंगी क्षमता अभाव आहे तो सनातन धर्म अस्मिता जपण्यात त्या इतरांनी दाखविलेल्या शोधात रमणारा परंपरेत अडकलेला वर्ण व जातीचे गुण खरे आहेत असा शोध घेणारा समाज आहे
व्यक्तीचे जाती अंतरंगत असलेल्या अधिष्ठानाला जो पर्यंत नकार दिला जात नाही तो पर्यंत वर्तमानातील कर्तुत्वाचे बुद्धीवैभव विकसित करण्याची आंतरीक ओढ व आस्कती निर्माण होणे नाही मुळात ती.प्रत्येक व्यक्ती जीवनात अत्यंत आवश्यक असते व्यवस्था विरुद्ध झुंज देत लढत राहण्याची जिद्द हवी असते ती विधायक संघर्ष साक्षरता प्राप्त केल्या शिवाय सतत पराभूत होऊ आणि शरण मानसिकतेत राहू. असे हि सुरक्षित जगता येते असे समजावून जगणारा समाज स्वतःचे अधिष्ठान निर्माण करू शकत नाही व स्वतःच्या वैफल्य ग्रस्त अशा ने निव ग्रस्त मानसिकतेतून बाहेर येवू शकत नाही तो संसर्गजन्य रोग नाहीसा होवू शकत नाही. हे भारतीय समाजाचे बुद्धी आणि मानसिक वर्तन जोपर्यंत समजावून घेतले जात नाही तोपर्यंत इथे बदलाचा प्रवास गतिमंद राहील हे निश्चितआहे
शिवजी रावत प्रेस
सातारा 18 जुलै 22
वेळ स 7.25