नोकरी मिळवणारे न बनता नोकरी देणारे बना’; डॉ. रिता शेटीया यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

नोकरी मिळवणारे न बनता नोकरी देणारे बना’; डॉ. रिता शेटीया यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

‘नोकरी मिळवणारे न बनता नोकरी देणारे बना’; डॉ. रिता शेटीया यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

वाघोली : “उद्योजकता हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा आहे. केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या मोहिमांतून उद्योजकतेला मोठी चालना दिली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळवण्याच्या मानसिकतेत न राहता, सरकारी योजनांचा लाभ घेऊन नोकरी देणारे उद्योजक बनावे,” असे प्रतिपादन ‘रिता इंडिया फाउंडेशन’च्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी केले.

​वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित विशेष सत्रात त्या बोलत होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ‘एम. आर. जयकर उद्योजकता विकास कार्यक्रमा’निमित्त “उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या योजना” या विषयावर या मार्गदर्शक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

योजनांची जनजागृती हीच यशाची गुरुकिल्ली

​यावेळी डॉ. शेटीया यांनी “उद्योजकांसाठी सरकारी व बँक योजना” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, “सरकारने स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान आणि सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.” त्यांनी आतापर्यंतच्या विविध योजनांचे यशापयश आणि त्यातील सुधारणांवरही प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​सत्राच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांना डॉ. शेटीया यांनी मार्मिक उत्तरे दिली. या कार्यशाळेमुळे उद्योजकतेकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाल्याचे दिसून आले.

उपस्थित मान्यवर:

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनीषा बोरा, समन्वयक श्री. डी. डी. गायकवाड, सहायक समन्वयक मोनिका जैन, डॉ. सविता शेटिया यांच्यासह TYBSc आणि TYBA चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *