इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ मुदतवाढ.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ मुदतवाढ.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ मुदतवाढ.
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
नियमित फेरी – एक, अर्जाचा भाग-२ भरणेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरीचिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नियमित प्रवेश फेरी क्र. १ साठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रवेश अर्जाचा भाग-१ भरणे तसेच पसंती अर्ज भाग-२ भरणेची मुदत दि.२७/०७/२०२२ रोजी संपलेली आहे. तथापि याबाबत पुढील बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.

१ २ प्रवेश अर्ज भाग-१ भरुन लॉक केलेला आहे परंतु अर्ज प्रमाणित झालेले नाहीत असे विद्यार्थी ६०४१ प्रवेश अर्ज भाग-१ प्रमाणित आहे परंतु भाग-२ भरलेला नाही असे विद्यार्थी ५८८९

अशाप्रकारे सुमारे ११९३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-२ भरलेले नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश फेरी – १ मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत सबब हे विद्यार्थी प्रेवशाच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. नियमित प्रवेश फेरी- १ साठी अर्ज करण्यास मुदवाढ.

२. सदर वाढीव कालावधीमध्ये नवीन अर्जाचा भाग – १ भरता येणार नाही. अर्ज भाग-१ शाळा व मार्गदर्शन केंद्र यांनी प्रमाणित करणे | दि. ३०/०७/२०२२ रोजी सायं. ०५:००वा पर्यंत. पसंती अर्ज भाग-२ भरुन लॉक करणे दि.३०/०७/२०२२ रोजी सायं. ०६:००वा पर्यंत.

३. कोटांतर्गत प्रवेश व सर्वसाधारण गुणवत्ता यादी बाबत दुरुस्ती यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार कार्यवाही सुरु राहील. तसेच दि.३०/०७/२०२२ नंतर प्रवेशाबाबत सर्व कार्यवाही यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु राहील त्यामध्ये कोणाताही बदल केलेला नाही.

४. सर्वसाधारण गुणवत्ता यादी पोर्टलवर विद्यार्थी लॉगीन मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपले गुण व गुणवत्ता क्रमांक तपासून खात्री करावी. त्याबाबत काही आक्षेप असल्यास Send Grievance द्वारे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, त्यानुसार संबंधित शिक्षण उपसंचालक यांनी तपासून त्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात. ही कार्यवाही दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी.

कोटांतर्गत प्रवेशाबाबत विद्यालय स्तरावरुन प्रवेशासाठी कोटांतर्गत राखीव ठेवलेल्या जागांवरील प्रवेश दिलेल्या वेळापत्रकानुसार विद्यालय स्तरावरुनच करता येतील. त्यासाठी प्रवेशाच्या पोर्टलवरुन कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यालयांना उपलब्ध केली जातील. कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणे व त्यामध्ये बदल करणे कार्यवाही निरंतर सुरु राहील. पहिल्या टप्प्यात निवड न झालेले तसेच नवीन पसंती नोंदविलेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र असतील अशा प्रकारे प्रत्येक प्रवेश फेरीसाठी दिलेल्या वेळेत विद्यालयांना कोटाप्रवेश करता येतील. कोटांतर्गत प्रवेशाबात शासन निर्णय क्र. न्यायाप्र-२०१५/६१/१५/एसडी-२ दि.२८/०३/२०१६ मधील तरतूदीनुसार करण्यात येतील.

६. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तपासून घेणे व नियमानुसार प्रवेश देणे ही जबाबदारी संबंधित विद्यालयांची असेल.

७. शासन निर्णय क्र प्रवेश – २०१८/प्रक्र. ३३३ / एसडी-२ दि. ०७/०३/२०१९ मधील तरतूदीनुसार इ.११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होईल.

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)महेश पालकर यांनी कळवले आहे. या संबंधात परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *