देशाच्या अर्थकारणात मुंबईचा मोठा वाटा : कार्याध्यक्ष:-जयदीप कवाडे
महाराष्ट्रातील मराठी माणसांसोबत गुजराती व राजस्थानी समाजाची मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठी कामगिरी : जयदीप कवाडे
मुंबई/नागपूर : भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार, मत अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात मराठी माणसांसोबत गुजराती, राजस्थानी आणि देशातील इतर राज्यातून येणाऱ्या व्यापारी वर्ग मुंबईच्या अर्थव्यवस्थेत हिरीरिने भाग घेतात. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांच्या कार्यालयाने खुलासा केला आहे. आता मराठी माणूस आणि गुजराती, राजस्थानी समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण कोणी करू नये अशी बोचक टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
मुंबई उभारण्यासाठी मराठी
माणसांचे योगदान जास्त आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात सर्वधर्म समभाव आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय बांधव येऊन व्यवसाय करतात, यात कुण्या एका समाजाचेच योगदान आहे, असे म्हणणे मुळातच चुकीचे आहे. देशात गुजराती व राजस्थानी व्यापाऱ्यांसोबत मराठी माणूस सुद्धा पुढे जात आहे. देशातील अग्रगण्य कंपन्या महाराष्ट्रात आहेत यात मराठी माणसांचे मोठे योगदान आहे,असेही जयदीप कवाडे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची महामहिम राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या आर्थिक राजधानीबद्दल जे वक्तव्य केले ते संतापजनक आहे. बोलण्यापूर्वी त्यांनी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. महाराष्ट्राने गुजराती व राजस्थानी समाजाला काय दिले त्याची माहिती कोश्यारी यांनी घ्यावी.देशात मुंबईचे असलेले स्थान कोणीही नाकारू शकत नाही. राज्यपाल हे मानाचे व प्रतिष्ठेचे पद आहे पण कोश्यारी यांनी या पदाची प्रतिमा धुळीस मिळवली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी अत्यंत हिनकस विधाने करून आमच्या थोर महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका नेहमीच महाराष्ट्रविरोधी राहिली आहे. राज्यपाल पदावर राहून ते सातत्याने बेजाबदार वक्तव्य करत असतात पण आता त्यांनी मर्यादी ओलांडली आहे. आम्ही राज्यपालपदाची प्रतिष्ठा जाणतो पण ती प्रतिष्ठा त्या पदावरील व्यक्तींनीही जपली आहे पण दुर्दैवाने कोश्यारी यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाची दखल घ्यावी व त्यांना परत बोलावावे अशी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ची भूमिका आहे, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे म्हणाले.