फोटो कॅप्शन :- लोकशाहीर अाण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना नगररचनाचे उपसंचालक धनंजय खोत,कोमनपाचे उपायुक्त रविकांत अडसूळ,जि.प.चे संजय अवघडे,अॅड.राहूल सडोलीकर,अमोल कुरणे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर,दि.१ (प्रतिनिधी) राजारामपुरी येथील अाण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास परिवर्तनवादी संघटनां तर्फे अॅड.राहुल सडोलीकर,नगररचना विभागाचे धनंजय खोत,कोल्हापूर महानगर पालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी संजय अवघडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी अॅड.राहुल सडोलीकर यांनी म्हटले की, आण्णाभाऊंनी शोषित,पीडित,वंचितांचे प्रश्न साहित्य रूपात मांडले. लोकशाहीर अाण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची आजही आवश्यकता आहे असे मनोगत नगररचना विभागाचे धनंजय खोत यांनी व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संजय अवघडे,परिवर्तन चे अध्यक्ष अमोल कुरणे,मारुती गायकवाड,सुवर्णा पृथ्वीराज कडोलकर,महेश घोलपे,चंद्रकांत दिंडे,बहुजन सेनेचे संस्थापक आदिनाथभाई साठे,बंडा अवघडे,दावीद भोरे,राज कुरणे आदी उपस्थित होते.