मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्रांतीचा सल्ला !
(विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्रातील सत्तांतर झाले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे साहेब आपल्या शिलेदारांंसह मुंबई ते सुरत व सुरतेहून आसाम व आसमातून गोवा मार्गे मुक्काम करत थेट विधानसभेत बहुमत चाचणीसाठी उपस्थीत झाले.
सतत प्रवास व राजकीय दगदग व मानसिक तणाव यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आहे.
प्रकृतीच्या कारणांमुळे डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली असल्याने सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे तसेच पुरग्रस्त विभागाचे दौरे व राजनैतिक दौरे व सभाही चालू आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत. न्यायालयीन लढाई, रखडलेल्या मंत्री मंडळातील नियुक्त्या, उदय सामंत सारख्या सहयोगी नेत्यांवर झालेला हल्ला. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या प्रकृतीकडे लक्ष देतात की नाही? हे लक्षात येत नाही. बिघडलेली राजकीय परिस्थिती महत्त्वपूर्ण आहे का? हे मुख्यमंत्रीच ठरवतील.