संजय राऊत यांना दिलासा नाही !
शरद पवारांची प्रतिक्रिया न आल्याने आश्चर्य.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या इडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आठ आँगस्ट पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आल्याने संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. आठ आँगस्ट नंतर सुद्धा त्याच्या सुटकेची शक्यता नाही . इडी कोठडी नंतर चौकशी साठी न्यायालयीन कोठडीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईच्या बहुचर्चित गोरेगावमधील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष कोर्टामध्ये हजर करण्यात आले. संजय राऊत यांना कोर्टाने एक जबरदस्त झटका दिला असून कोठडीमध्ये वाढ केली आहे. राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवार दिनांक ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज चार आँगस्ट रोजी कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. अटक झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणी मध्ये विशेष गंभीर बाब नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर सुनावणी सुरू झाली. तपासात नवीन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली आहे, आर्थिक गैरव्यवहार संबंधित काही व्यक्तींची आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. याकरता कोठडीत वाढ करुन देण्यात आली आहे. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याने सांगितले आहे भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता.
संजय राऊत यांची यापूर्वी सुध्दा इडी चौकशी केली होती. त्याप्रसंगी राज्यातील सर्वोच्च नेते शरद पवार साहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती व केंद्रीय तपास यंत्रणा सुडबुध्दीने राज्यातील नेत्यांवर कारवाई करत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला होता. परंतु संजय राऊत यांच्या अटके नंतर शरद पवारांची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप व्यक्त झाली नाही या बद्दल समाज माध्यमांवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या अटके नंतर शिवसेना कार्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे अशी भावना व्यक्त केली होती.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर शरद पवारांचे न बोलणे आज लोकांच्या बोलण्याचा विषय झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी इडीकडून चालू आहे. या गैरव्यवहारातील भक्कम पुरावा इडीकडे असल्याने संजय राऊत यांना सध्यातरी दिलासा मिळेल असे दिसत नाही.