विद्याभूषण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दहिसर तर्फे
स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा
या मोहिमेसाठी जनजागृती प्रभात फेरी आयोजित करण्यात आली.
सदर प्रभात फेरीत दहिसर पोलीस स्टेशनने सम्पूर्ण नियोजन केले होते.
दहिसर पोलीस स्टेशन चे हवालदार सावंत सर, भोईर मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सम्पूर्ण प्रभात फेरीत संचलन केले. विद्याभूषण शिक्षण संस्थेचे सचिव श्री अशोक नर साहेब, प्राचार्य संजय पाटील व सौ प्रिया ताम्हणकर, श्री श्रीराम चौधरी, श्री कदम, श्री तोग्रीकर, श्री शिरसाट , श्री वारुळे ,कुमारी शिला बनसोडे व सौ विजयश्री सिंह हे शिक्षक सहभागी झाले होते.
8 वी ते 10 वी चे सुमारे 225 विद्यार्थ्यांनी घोषणा व बॅनर मार्फत प्रभात फेरी यशस्वी केली.