भिवापुर तालुक्यातील महालगाव येथे
शिक्षक व अंगणवाडी सेविका शिक्षण परिषदेचे आयोजन:-
निपुन भारत अभियानांअतर्गत तालुक्यातील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा महालगाव येथे शिक्षक व अंगणवाडी सेविका शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे संयोजक मान.श्री.परसरामजी पिल्लेवान सर(केंद्र. प्र.महालगाव)यांनी केले होते, तर या परिषदेचे अध्यक्ष म्हणून मान.श्री.राजुजी वांगे(अध्यक्ष. शा.व्य.स.महालगाव)प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रुपेंद्र आंबुलकर सर(मु.अ.भिवी टेकडी),श्री.मनोहर बेले सर (मु.अ.उरकुडापार),श्री.देवरावजी डेकाटे सर(सालेभट्टी दंदे) तसेच श्रीमान.मंगेश जी कोकाटे(शिक्षण प्रेमी सदस्य महालगाव)
या सर्व पाहुण्यांनी शिक्षणाची जनक ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करुन प्रास्ताविक मान.श्री.परसरामजी पिल्लेवान सरांनी (केंद्र प्र.महालगाव)निपुन भारत अभियांनाचे महत्त्व पटवून दिले, तरया कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राजुजी वांगे(शा.व्य.स.अध्यक्ष)यांनी निपुन भारत अभियान ही एक विद्यार्थ्यांना नवजीवन संगिणी आहे.ती अंगणवाडी सेविका व शिक्षक यांनी प्रभावीपणे राबवून आदर्श विद्यार्थी घडवावेत अशी मनोकामना मंगलमय मंगलकामना देऊन परिषदेचे उद्घाटन झाले असे जाहीर केले.
विषय:-१)निपुन भारत अभियान:-पाश्वभुमी, गरज व महत्त्व. श्री.महेश हांडे सर(उरकुडापार)यांनी या विषयावर शिक्षकांचे उद्बबोदन अत्यंत भावनिक पणे केले.
विषय:-२)पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान FLNमिशन हेतु:-भाषा,गणित श्री.राजुरे सर (भिवी टेकडी)यांनी उद्बबोदन केले.
विषय:-३)शाळापुर्व तयारी -पहीले पाऊल..विद्याप्रवेश.. सौ.रश्मी डेकाटे मँडम यांनी मार्गदर्शन केले.
विषय:-४)अध्ययन/अध्यापन साहित्याचा वापर करून परिणाम… कु.दमयंता राऊत मँडम (बेल्लपार)यांनी मार्गदर्शन केले.
विषय:-५) विविध भागधारकांची भुमिका-पालक व समाज सहभाग..श्री.रुपेद्र आंबुलकर सर(मु.अ.भिवी टेकडी) यांनी मार्गदर्शन केले.
विषय:-६)FLNमुल्यमापन-राष्ट्र राज्यस्तरीय मुल्यांकन NAS2021, FLS 2022,SNAS2023…,श्री.ओमप्रकाश कामडी सर यांनी उद्बबोदन केले.
या कार्यक्रमाला गटसाधन केंद्र भिवापुर येथील साधनव्यक्ती श्रीमान मिलिंद जी मेश्राम सर तसेच श्रीमती मेघा गुरुनुले साधनव्यक्ती यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले. यात गटकार्य देण्यात आलेले होते ते कार्य गटप्रमुखांनी सादरीकरण उत्तमप्रकारे केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल वंजारी सर यांनी निपुन भारत अभियानाची प्रतिज्ञा देऊन आभार मानले. सर्वच शिक्षक अंगणवाडी सेविका १००% उपस्थित होते. अशाप्रकारे शिक्षण परिषद संपन्न झाली.
Posted inनागपूर
भिवापुर तालुक्यातील महालगाव येथे
शिक्षक व अंगणवाडी सेविका शिक्षण परिषदेचे आयोजन:-
